Joe Root : 5 वर्षात 24 टेस्ट शतकं! जो रूटच्या सेंच्युरींचा स्पीड सुसाट, कधीपर्यंत मोडणार सचिन तेंडूलकरचा महान रेकॉर्ड?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Joe Root Century records : इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याने सिडनी कसोटीत आपल्या कारकिर्दीतील 41 वं शतक झळकावत खळबळ उडवून दिली आहे. या शानदार कामगिरीसह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी महान कॅप्टन रिकी पाँटिंग याच्या 41 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.
advertisement
1/8

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या ॲशेस कसोटी मॅचमध्ये क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेणारी एक मोठी कामगिरी नोंदवली गेली. इंग्लंडचा स्टार खेळाडू जो रुट याने इतिहास रचला.
advertisement
2/8
ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर आणि खेळपट्टीच्या आव्हानात्मक परिस्थितीत इंग्लंडच्या जो रुटने आपल्या अनुभवाच्या जोरावर ऐतिहासिक खेळी साकारली. या खेळीमुळे त्याने जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांच्या विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
advertisement
3/8
इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट याने सिडनी कसोटीत आपल्या कारकिर्दीतील 41 वं शतक झळकावत खळबळ उडवून दिली आहे. या शानदार कामगिरीसह त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी महान कॅप्टन रिकी पाँटिंग याच्या 41 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली.
advertisement
4/8
विशेष म्हणजे पाँटिंगला हा टप्पा गाठण्यासाठी 168 कसोटी मॅच खेळाव्या लागल्या होत्या, तर रूटने केवळ 163 मॅचमध्येच ही मजल मारली आहे. आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्यांच्या यादीत रूटच्या पुढे केवळ जॅक कॅलिस (45) आणि सचिन तेंडुलकर (51) हे दोनच खेळाडू उरले आहेत.
advertisement
5/8
जो रूट ज्या वेगाने धावांचा पाऊस पाडत आहे, ते पाहता सचिन तेंडुलकरचा 51 शतकांचा आणि 15,921 धावांचा जागतिक विक्रम आता धोक्यात असल्याचे दिसत आहे. रूट सध्या सचिनच्या धावांच्या विक्रमापासून साधारण 2,100 रन्स मागे आहे.
advertisement
6/8
ज्या पद्धतीने तो सध्या बॅटिंग करत आहे, ते पाहता पुढील 20 ते 25 कसोटी मॅचमध्ये तो हा ऐतिहासिक टप्पा गाठू शकतो असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सचिनचा शतकांचा विक्रम मोडण्यासाठी त्याला अजून केवळ 11 शतकांची आवश्यकता आहे.
advertisement
7/8
या दौऱ्यात जो रूटने आपल्यावरील सर्वात मोठी टीकाही पुसून काढली आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर एकही शतक नसल्याचा जो ठपका त्याच्यावर होता, तो त्याने या सिरीजमध्ये दोन शतकं झळकावून खोडून काढला आहे. सिडनीमधील हे शतक त्याच्यासाठी मानसिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं जातंय.
advertisement
8/8
दरम्यान, जो रुटच्या शतकामुळे इंग्लंडच्या टीमला देखील मोठा आधार मिळाला आहे. रूटची ही 'बॅझबॉल' शैलीतील खेळी येणाऱ्या काळात कसोटी क्रिकेटचे अनेक जुने रेकॉर्ड मोडीत काढण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत देत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Joe Root : 5 वर्षात 24 टेस्ट शतकं! जो रूटच्या सेंच्युरींचा स्पीड सुसाट, कधीपर्यंत मोडणार सचिन तेंडूलकरचा महान रेकॉर्ड?