TRENDING:

Ranji Trophy Final : नागपूरच्या पठ्ठ्याने मैदान गाजवलं, रणजीच्या फायनलमध्ये खणखणीत शतक,कोण आहे दानिश मालेवार?

Last Updated:
केरळ आणि विदर्भ या दोन संघात रणजी ट्रॉफीचा फायनल सामना सूरू आहे. या सामन्यात नागपूरच्या पठ्ठ्याने खणखणीत शतक ठोकलं आहे. त्याच्या शतकाने विदर्भाने फायनल सामन्यात दणक्यात सूरूवात केली आहे.
advertisement
1/7
नागपूरच्या पठ्ठ्याने मैदान गाजवलं,रणजीच्या फायनलमध्ये खणखणीत शतक,कोण आहे दानिश
केरळ आणि विदर्भ या दोन संघात रणजी ट्रॉफीचा फायनल सामना सूरू आहे. या सामन्यात नागपूरच्या पठ्ठ्याने खणखणीत शतक ठोकलं आहे. त्याच्या शतकाने विदर्भाने फायनल सामन्यात दणक्यात सूरूवात केली आहे.
advertisement
2/7
खरं तर रणजीच्या फायनल सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विदर्भाची अवस्था अत्यंक बिकट झाली होती. कारण विदर्भाचे सलामीचे तीनही खेळाडू लवकर बाद झाले होते.त्यामुळे विदर्भ बॅकफुटवर गेली होती.
advertisement
3/7
पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या दानिश मालेवारने संघाचा डाव सावरत संपूर्ण मॅच पालटली आहे. 21 वर्षीय दानिशने फायनल सामन्यात शतक ठोकलं. 168 बॉलमध्ये त्याने हे शतक ठोकलं.
advertisement
4/7
दानिशच्या शतकाची खास गोष्ट म्हणजे त्याने कठीण परिस्थितीत शतक ठोकून विदर्भाला अडचणीतून बाहेर काढले आहे. यावेळी कर्णधार करूण नायरची त्याला साथ लाभली.
advertisement
5/7
दानिश हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेला मुलगा आहे. दानिशचे वडिल विष्णू यांचे स्वप्न होते की त्यांचा मुलगा एक मोठा क्रिकेटर व्हावा. पण स्वप्न काय खिसे भरत नाही.त्यामुळे घरची बिकट परिस्थिती असताना देखील त्यांनी मुलाला आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या.
advertisement
6/7
दानिशचा या हंगामाच्या सुरुवातीला आंध्रविरुद्ध प्रथम श्रेणी सामन्यात पदार्पण करण्यापूर्वी मालेवारने स्थानिक स्पर्धांमध्ये आपले कौशल्य वाढवले. दुसऱ्या डावात ६१ धावा केल्याने त्याच्याकडे रेड-बॉल क्रिकेटसाठी योग्य खेळ असल्याचे दिसून आले.त्यानंतर सातत्याने खेळण्याची मालिका सुरू झाली.
advertisement
7/7
दरम्यान नाणेफेक जिंकल्यानंतर केरळ संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाची सुरुवात खराब झाली ११ धावांच्या आत संघाने दोन्ही सलामीवीर पार्थ राखडे आणि ध्रुव शोरे यांची विकेट गमावली. त्यानंतर दर्शन नालकांडेच्या रूपात तिसरी विकेट गमावली. त्यानंतर दानिश आणि करूणने डाव सावरला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Ranji Trophy Final : नागपूरच्या पठ्ठ्याने मैदान गाजवलं, रणजीच्या फायनलमध्ये खणखणीत शतक,कोण आहे दानिश मालेवार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल