Suryakumar Yadav : सुर्याला लागलं ग्रहण! बॅटीतून धावाच निघेना, 6 सामन्यात 40 चाही आकडा गाठला नाही
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा टी20 कर्णधार सुर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरूद्धची टी20 मालिका 4-1ने जिंकली होती. सुर्यकुमारने कर्णधारपदात आपली चमक दाखवली पण फलंदाजीत त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही.
advertisement
1/7

टीम इंडियाचा टी20 कर्णधार सुर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंडविरूद्धची टी20 मालिका 4-1ने जिंकली होती. सुर्यकुमारने कर्णधारपदात आपली चमक दाखवली पण फलंदाजीत त्याला फारशी कमाल दाखवता आली नाही.
advertisement
2/7
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमार यादवला 5.60 च्या सरासरीने फक्त 28 धावा करता आल्या होत्या. एका खेळाडूच्या दृष्टीने या समाधानकारक धावा नाहीयेत.
advertisement
3/7
दरम्यान आता टी20 मालिकेनंतर सुर्यकुमार रणजी स्पर्धेत परतला आहे. सूर्यकुमार आता मुंबईकडून रणजी ट्रॉफीचा क्वार्टर फायनल सामना खेळला. मुंबई आणि हरियाणा यांच्यातील हा सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे.
advertisement
4/7
रणजीमध्येही त्याचा परफॉर्मन्स फ्लॉप ठरला आहे. मुंबईच्या पहिल्या डावात सूर्यकुमार यादवला 5 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने फक्त 9 धावा करता आल्या. सूर्यकुमारला वेगवान गोलंदाज सुमित कुमारने एका शानदार चेंडूवर क्लीन बोल्ड केले.
advertisement
5/7
दरम्यान आता देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट एकत्र करून, सूर्यकुमारने गेल्या सहा डावांमध्ये फक्त 37 धावा केल्या आहेत.
advertisement
6/7
सूर्यकुमार यादवला 15 टी20 सामन्यांमध्ये 18.42 च्या सरासरीने फक्त 258 धावा करता आल्या आहेत. सूर्याची एकूण टी20 कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. सूर्याने भारतासाठी 83 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 38.20 च्या सरासरीने 2 हजार धावा केल्या आहेत. या काळात त्याच्या बॅटने 4 शतके आणि 21 अर्धशतके झळकावली.
advertisement
7/7
भारताकडून टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सूर्यापेक्षा जास्त धावा केल्या. गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यात सूर्यकुमारने भारताच्या टी20 संघाच्या पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : सुर्याला लागलं ग्रहण! बॅटीतून धावाच निघेना, 6 सामन्यात 40 चाही आकडा गाठला नाही