PM मोदींचाही पगार कमी; सरकारकडून कोणाला मिळते सर्वात जास्त सॅलरी
- Published by:Priya Lad
Last Updated:
सरकारी नोकरी किंवा सरकारी पद म्हणजे भरमसाठ पगार असं अनेकांना वाटतं. भारत सरकारकडून सर्वात जास्त पगार कोणाला आणि किती मिळतो माहिती आहे का?
advertisement
1/6

पंतप्रधान देशाचे प्रमुख. त्यांना पगारही सर्वात जास्त असेल असं अनेकांना वाटतं. पण सरकारकडून पगार घेण्याच्या बाबतीत पंतप्रधान पाचव्या क्रमांकावर आहेत.
advertisement
2/6
पंतप्रधानांना दरमहा 1.66 लाख रुपये पगार मिळतो. ज्यामध्ये विविध प्रकारचे भत्ते देखील समाविष्ट आहेत. सरकारी निवासस्थाना व्यतिरिक्त, त्यांना एसपीजी सुरक्षा, विशेष जहाजे, बुलेट प्रूफ वाहने आणि सर्व प्रकारच्या सुविधा देखील पुरवल्या जातात.
advertisement
3/6
चौथ्या क्रमांकावर भारताचे सरन्यायाधीश आहेत. CJI यांना महिन्याला 2,80,000 रुपये पगार मिळतो. याशिवाय राजधानी दिल्लीत भाड्याने मोफत बंगला, 24 तास सुरक्षा कर्मचारी, कार यासारख्या सुविधा दिल्या जातात.
advertisement
4/6
राज्यपाल तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारत सरकार राज्यपालांना 3,50,000 रुपये मासिक वेतन देतं. याशिवाय प्रत्येक राज्यात राज्यपालांसाठी आलिशान बंगला, सुरक्षा कर्मचारी, नोकर आदी सुविधाही उपलब्ध आहेत.
advertisement
5/6
पगाराच्या बाबतीत उपराष्ट्रपती दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना दरमहा 4,00,000 रुपये पगार मिळतो. याशिवाय अनेक प्रकारचे भत्ते, मोठमोठे बंगले, आलिशान गाड्या, 24 तास सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय सुविधा आदी सुविधाही उपलब्ध आहेत.
advertisement
6/6
भारत सरकार राष्ट्रपतींना सर्वाधिक वेतन देते. राष्ट्रपतींना दरमहा 5,00,000 रुपये पगार मिळतो. याशिवाय सर्व प्रकारचे भत्ते, सरकारी निवासस्थान म्हणून राष्ट्रपती भवन, सरकारी वाहने, 24 तास सुरक्षा कर्मचारी आणि प्रचंड कर्मचारी उपलब्ध आहेत.