TRENDING:

कालपर्यंत तर इथं काहीच नव्हतं; अचानक तिथं जे दिसलं ते पाहून शास्त्रज्ञही हैराण

Last Updated:
गेल्या 15 कोटी वर्षांपासून ते जमिनीखाली गाडले गेलं होतं.
advertisement
1/5
कालपर्यंत तर इथं काहीच नव्हतं; अचानक तिथं जे दिसलं ते पाहून शास्त्रज्ञही हैराण
इतिहासाच्या उदरात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही पण जेव्हा त्यांचे अवशेष सापडतात तेव्हा आपण थक्क होतो. पुन्हा एकदा शास्त्रज्ञांनी असंच काहीतरी शोधून काढलं आहे. जे पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. ही छोटीमोठी गोष्ट नसून संपूर्ण खंड आहे, जो पूर्वी ऑस्ट्रेलिया असायचा. (फोटो -प्रतीकात्मक)
advertisement
2/5
गेल्या 15 कोटी वर्षांपासून ते जमिनीखाली गाडले गेले होते. लाखो वर्षांपूर्वी या पृथ्वीवर एक खंड अस्तित्वात होता, परंतु तो हळूहळू हिंदी महासागराच्या हजारो फूट खाली पोहोचला. विशेष म्हणजे इतक्या वर्षांनंतर तो पुन्हा एकदा सापडला आहे. डेली मेलच्या वृत्तानुसार, नेदरलँड्सच्या उट्रेच विद्यापीठाच्या भूवैज्ञानिकांच्या टीमला अॅग्रोलँड नावाच्या खंडाचे पुरावे मिळाले आहेत. (फोटो - डेली मेल)
advertisement
3/5
हा एकूण 3100 मैल जमिनीचा तुकडा आहे, जो हिंद महासागरात 18000 फूट खोलीवर गाडला गेला होता. मिळालेल्या पुराव्यांनुसार, हा खंड टेक्टोनिक प्लेट्सच्या स्थलांतराच्या वेळी नाहीसा झाला असावा. एल्डर्ट अॅडव्होकेटच्या मते, आग्नेय आशियातील परिस्थिती अगदी वेगळी आहे आणि विशेषत: आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेच्या तुलनेत, जिथं खंड सहजपणे 2 भागांमध्ये विभागला गेला आहे.  अॅग्रोलँडचे अनेक तुकडे झाले. (फोटो - डेली मेल)
advertisement
4/5
या खंडाचे तुकडे कसे झाले आणि इंडोनेशिया आणि म्यानमारसारखे देश कसे निर्माण झाले याचे संशोधकांनी संगणक पुनर्रचनेद्वारे चित्र तयार केलं. लाखो वर्षांमध्ये या खंडाच्या संपूर्ण भागाऐवजी, लहान तुकडे सापडले. आत्तापर्यंतच्या सर्व भूगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांना भेटल्या असतील तेव्हा या प्रक्रियेत पृथ्वीचा हा भाग सबडक्शन झोनमध्ये गेला असेल. (फोटो - डेली मेल)
advertisement
5/5
त्याचे दोन भाग स्पष्टपणे विभागलेले नसल्यामुळे, त्यातील काही भाग म्यानमारची जंगलं म्हणून राहिला आहे आणि काही आशियातील विविध बेटांवर गेला आहे. आता त्याचा काही भाग पृथ्वीच्या कवचाखालून सापडला आहे. (फोटो - प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
कालपर्यंत तर इथं काहीच नव्हतं; अचानक तिथं जे दिसलं ते पाहून शास्त्रज्ञही हैराण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल