TRENDING:

Crab : लाल आणि काळ्या पाठीच्या खेकड्यांमध्ये काय फरक असतो? खाणाऱ्यांनाही माहित नसेल उत्तर

Last Updated:
पावसाळा जवळ आला तर मासोळी बाजारात खेकडा आणि चिंबोऱ्यांची आवक वाढते. नदी, खाडी आणि समुद्र इत्यादींमधील खेकडे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. तेव्हा लाल आणि काळ्या पाठीच्या खेकड्यांमध्ये काय फरक असतो याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/6
लाल आणि काळ्या पाठीच्या खेकड्यांमध्ये काय फरक असतो?
पावसाळ्यात अनेकजण नदी तसेच खाडी परिसरात खेकडे/ चिंबोऱ्या पकडण्यासाठी जातात. खेकड्यांच्या मांसात एंटीऑक्सिडेंट असते त्यामुळे यांचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे तज्ज्ञ सांगतात.
advertisement
2/6
खेकडा आणि चिंबोरी यात काय फरक असतो या प्रश्नावर कोरा या सोशल साईट वरील युझर्सनी उत्तर दिल आहे. एका युझरने लिहिले खेकडा म्हणजे सर्व प्रकारचे खेकडे, त्यात चिंबोऱ्या पण येतात. परंतु काही भागात फक्त काळ्या रंगाच्या खेकड्याना चिंबोऱ्या म्हणून संबोधलं जात.
advertisement
3/6
इतर रंगांचे खेकडे आणि चिंबोऱ्या यांच्यात खूप फरक असतो. सफेद आणि लाल रंगाच्या (समुद्री खेकडे वगळता) खेकड्या खाण्यापेक्षा चिंबोऱ्या म्हणजेच काळ्या रंगाचे खेकडे जास्त चविष्ट लागतात.
advertisement
4/6
समुद्रात मिळणाऱ्या चिंबोऱ्या यांच्यात जास्त मांस आढळते आणि त्या आकाराने मोठ्या सुद्धा असतात. तर त्याउलट नदीत मिळणारी खेकडी आतून पोची (जास्त मांस नसलेली) असू शकतात. तसेच त्यांचा आकार चिंबोऱ्यांपेक्षा तुलनेनं लहान असतो.
advertisement
5/6
इतर खेकडे सहज मिळतात पण चिंबोऱ्या सहज मिळत नाहीत. चिंबोऱ्या खोल पाण्यात अथवा किंवा लांबलचक मोठ्या बिळात वास्तव्य करतात. त्यामुळे मासे विक्रेत्यांकडूनच तुम्ही चिंबोऱ्या विकत घेऊ शकता.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
Crab : लाल आणि काळ्या पाठीच्या खेकड्यांमध्ये काय फरक असतो? खाणाऱ्यांनाही माहित नसेल उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल