हे करायला हिंमत लागते! गरीब पोरावर जडला जीव अन् तिने बापाच्या 2500 कोटींच्या संपत्तीवर मारली लाथ!
- Published by:sachin Salve
- trending desk
Last Updated:
अँजेलिन वडिलांच्या 2500 कोटी रुपयांच्या संपत्तीची वारस होती; पण तिने आपल्या वडिलांची अट ऐकून क्षणात प्रेमाची निवड केली होती.
advertisement
1/6

काही वर्षांपूर्वी जपानची राजकुमारी माकोने राजघराण्याच्या नियमांचं पालन न करता सामान्य कुटुंबातल्या प्रियकराशी लग्न केलं होतं. जपानच्या राजघराण्यातल्या एखाद्या मुलीला सामान्य कुटुंबातल्या मुलाशी लग्न करायचं असेल, तर तिला रॉयल टायटल सोडावं लागतं. या नियमानुसार, राजकुमारी माकोनं आपल्या रॉयल टायटलचा त्याग करून वडिलोपार्जित संपत्तीवरचा हक्कदेखील सोडला आहे.
advertisement
2/6
आता मलेशियामध्येदेखील असाच काहीसा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. अँजेलिन फ्रान्सिस नावाच्या मुलीने आपल्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी हजारो कोटी रुपये संपत्तीचा त्याग केला.
advertisement
3/6
अँजेलिन मलेशियातले बिझनेस टायकून खू के पेंग (Khoo Kay Peng) यांची मुलगी आहे. ती आपल्या वडिलांच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची वारसदार होती. तिच्या वडिलांनी तिला राजकुमारीसारखं वाढवलं; मात्र लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेली अँजेलिन एका सामान्य माणसाच्या प्रेमात पडली. जेडिया असं या तरुणाचं नाव आहे. सामान्य घरातला जेडिया अँजेलिनवर मनापासून प्रेम करतो.
advertisement
4/6
अँजेलिनचे वडील खू के पेंग यांनी मलेशियातल्या मिस युनिव्हर्सशी लग्न केलं होतं. अँजेलिन या जोडप्याची मुलगी आहे. काही काळानंतर खू के पेंग यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला; पण त्यांनी आपल्या मुलीला जिवापाड जपलं. अँजेलिन आपलं उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये गेली. तिथे ती जेडिया नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली.
advertisement
5/6
अँजेलिन आणि जेडिया यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला; पण अँजेलिनच्या वडिलांनी या नात्याला ठामपणे नकार दिला. जेडिया अतिशय सामान्य कुटुंबातला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या मुलीचा हात त्याच्या हातात देण्यास स्पष्ट नकार दिला होता; मात्र अँजेलिन त्याच्याशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होती. आपल्या मुलीचा हट्ट मोडून काढण्यासाठी खू पेंग यांनी तिला अट ठेवली. त्यांनी तिला प्रेम आणि पैसा यांपैकी एकाची निवड करण्यास सांगितलं.
advertisement
6/6
अँजेलिन वडिलांच्या 2500 कोटी रुपयांच्या संपत्तीची वारस होती; पण तिने आपल्या वडिलांची अट ऐकून क्षणात प्रेमाची निवड केली होती. अँजेलिनने 2008ध्ये जेडियाशी लग्न केलं आहे. दोघेही सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. तिची लव्ह स्टोरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Viral/
हे करायला हिंमत लागते! गरीब पोरावर जडला जीव अन् तिने बापाच्या 2500 कोटींच्या संपत्तीवर मारली लाथ!