पाणीपुरवठा पंप जळला, ५ दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
मागील पाच दिवसांपूर्वी विजेच्या अतिरिक्त दाबामुळे पाणीपुरवठा पंप जळून खाक झाला. स्पेअर म्हणून ठेवलेल्या पंपालाही मोठा नुकसान झाल्याने शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. नगरपरिषदेकडे पर्यायी व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे, ऐन पावसाळ्यात नागरिकांना पिण्याचे आणि वापराचे पाणी टँकर शिवाय बाटली बंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
advertisement
वाढती लोकसंख्या, पण जुनी पाणीपुरवठा योजना कायम
चाकण शहराला सध्या जुनी पाणीपुरवठा योजना लागू आहे. दररोज सुमारे 7 ते 8 लाख लिटर पाणी पुरवठा केला जातो, पण शहराची लोकसंख्या 2-3 लाखांनी वाढल्यामुळे हा पुरवठा गरजेच्या तुलनेत कमी पडतो. या वाढत्या मागणीनुसार पालिकेला पायाभूत सुविधा वाढविण्यात मोठे आव्हान येत आहे. विशेषतहा पंपाचा वीजपुरवठा बंद पडल्यास किंवा पाइपलाइन फुटल्यास शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सध्या शहराला एक दिवसाआडच पाणीपुरवठा केला जात आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यास किंवा पाइपलाइनचे नुकसान झाल्यास पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होतो. वाढती लोकसंख्या ही जुन्या योजनेवर ताण आणत आहे. मात्र, भामा आसखेड येथील नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे, असं मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी सांगितले आहे.