TRENDING:

Ganeshotsav 2025: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पा, हत्तीच्या सोंडेतील साकारली अनोखी मूर्ती, Video

Last Updated:

गणेशोत्सवाचा जल्लोष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, प्रत्येक घरात बाप्पाचे आगमन आनंदाचे वातावरण निर्माण करत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : गणेशोत्सवाचा जल्लोष राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, प्रत्येक घरात बाप्पाचे आगमन आनंदाचे वातावरण निर्माण करत आहे. सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या घरी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना केली असून, यावेळी तिने बाप्पाला निसर्गातून आणि पानांतून साकारण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. हत्तीच्या सोंडेतून गणपती बाप्पा प्रकट होत असल्याचे आकर्षक दृश्य या मूर्तीत पाहायला मिळते.
advertisement

सोनाली कुलकर्णीने यावर्षीच्या गणेशोत्सवात निसर्ग आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्याची सवय तिने अनेक वर्षांपासून जपली असून, यंदाही ती स्वतःच्या हातांनी बाप्पाची मूर्ती घडवली आहे. यंदाच्या मूर्तीमध्ये निसर्गाशी असलेली आपली नाळ आणि समतोल दाखवण्यावर तिचा विशेष भर आहे.

Ganeshotsav 2025: पुण्यात भाऊसाहेब रंगारी गणपतीसमोर मर्दानी खेळ, इटलीच्या तरुणीने जे केलं लोक पाहतच राहिले VIDEO

advertisement

सोनालीने सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून मी स्वतः बाप्पाची मूर्ती बनवते. हा माझ्यासाठी एक आत्मिक अनुभव आहे. आपण निसर्गाशी एकरूप राहून सण साजरा केला पाहिजे, याच भावनेतून मी ही मूर्ती तयार केली आहे. हत्तीच्या सोंडेतून बाप्पा प्रकट होत असल्याची संकल्पना मी यावर्षी मूर्तीत आणली आहे.

View More

तिने यावेळी एक वेगळीच प्रार्थना केली आहे. महाराष्ट्रात रस्त्यांवरील खड्डे हटावेत आणि राज्य खड्डेमुक्त व्हावे यासाठी तिने बाप्पाकडे साकडे घातले आहे. हा सामाजिक संदेश तिच्या भाविकतेसोबत जोडला गेला आहे.

advertisement

सोनाली कुलकर्णीच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर तिचे दोन चित्रपट सध्या अडकलेले आहेत. याबाबत ती म्हणाली, मी बाप्पाला प्रार्थना करते की हे अडकलेले सिनेमे लवकर रिलीज व्हावेत आणि प्रेक्षकांच्या भेटीस यावेत. यामध्ये छत्रपती ताराराणी, रावसाहेब हा चित्रपट पूर्ण झाला असला तरी काही तांत्रिक कारणांमुळे त्यात विलंब झाला आहे. बाप्पाच्या कृपेने हे सर्व अडथळे दूर होतील अशी मला खात्री आहे.

advertisement

तिचा आणखी एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार असून त्याबाबतही ती उत्सुक आहे. चित्रपटाचं नाव आणि सगळ्या गोष्टी लवकरच जाहीर करतील, असे तिने सांगितले.

सोनालीने दिलेला हा संदेश सणासुदीच्या काळात खूप महत्त्वाचा आहे. गणेशोत्सव म्हणजे केवळ श्रद्धा आणि भक्ती नव्हे, तर समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी सकारात्मक देण्याची संधीही आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात सोनाली कुलकर्णीच्या घरी विराजमान झालेला हा अनोखा, पर्यावरणपूरक बाप्पा तिच्या चाहत्यांसाठी आकर्षण ठरत आहे. निसर्गातून साकारलेली मूर्ती, सामाजिक संदेश आणि सिनेसृष्टीतील नवीन घडामोडी यामुळे या गणेशोत्सवात सोनालीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav 2025: अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पा, हत्तीच्या सोंडेतील साकारली अनोखी मूर्ती, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल