मुंबई : राज्यातील किमान आणि कमाल तापमानात सातत्याने बदल होत आहेत. यामुळे बदलत्या वातावरणात नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. मध्यंतरी राज्यातील बहुतेक शहरांमध्ये उष्णतेत वाढ झाल्याचे पाहायला मिळालं तसेच थंडी देखील बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती. आता पुन्हा एकदा राज्यामध्ये थंडीची लाट पाहायला मिळणार आहे. अनेक प्रमुख शहरांमध्ये किमान तापमान हे 9 ते 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येणार आहे. पाहुयात 7 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 14 अंश एवढे राहील. मुंबईतील किमान तापमानात घट होत असल्याने थंडी वाढल्याचे पाहायला मिळेल. पुण्यामध्येही किमान तापमानात लक्षणीय घट पाहायला मिळणार आहे. पुण्यामध्ये सकाळच्या वेळी दाट धुके तर त्यानंतर निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान केवळ 10 अंश सेल्सिअस एवढे राहील.
कोरडवाहू जमिनीत सोनं पिकवलं, शेजाऱ्यांकडून पाणी घेतलं, शेतकऱ्याने 3 लाख कमवून दाखवले!
मराठवाड्यातही थंडीचा जोर वाढणार आहे. 7 जानेवारी रोजी संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 सेल्सिअस राहील. किमान तापमानात 2 अंशांनी घट नोंदवली जाणार असून यामुळे थंडी वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्राला ही शीत लहरीचा सामना करावा लागणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 7 जानेवारी रोजी निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहील. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे राहील.
एकंदरीत मध्यंतरी वाढलेले किमान आणि कमाल तापमान आता पुन्हा एकदा कमी होण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे शहरांमधील तापमानाचा पारा घसरणार असून थंडीचा जोर वाढणार आहे. बदलत्या वातावरणात नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे राहणार आहे.





