मुंबई : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसून येत आहे. राज्यात कधी थंडीचा जोर कमी तर कधी जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. 3 दिवस आधी राज्यातील थंडीचा जोर कमी झालेला दिसून येत होता. मात्र, आता राज्यात थंडीचा जोर आणखी वाढलाय. पुणे, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील किमान तापमानात आणखी घट बघायला मिळत आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात 21 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. मुंबईतील किमान तापमानात 2 दिवस आधी घट बघायला मिळाली होती. मात्र, आता मुंबईतील किमान तापमानात वाढ होऊन ते 18 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस इतके असणार आहे.
22 दिवसांमध्ये पिक हातात, खर्च फक्त 10 हजार; 3 लाख कमाईची हमी!
पुण्यातील किमान तापमानात 2 अंशांनी वाढ झाली आहे. 21 डिसेंबरला पुण्यातील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. पुण्यामध्ये 21 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ असणार आहे.
मराठवाड्यातील थंडीचा जोर 3 दिवस आधी कमी झाला होता. 21 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर किमान तापमानात घट होऊन ते 11 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पुढील 24 तासांत मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे.
विदर्भातील थंडीचा जोर गेल्या काही दिवसांत कमी झालेला दिसून येत आहे. नागपूरमधील किमान तापमानात वाढ होऊन 17 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस इतके असणार आहे. नागपूर मध्ये 21 डिसेंबरला धुक्यासह ढगाळ आकाश असणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अजूनही कायम आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये 21 डिसेंबरला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून थंडीचा जोर कमी जास्त होत आहे. 21 डिसेंबरला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे येथील किमान तापमानात घट नोंदवल्या गेली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना थंडीचा कडाका सहन करावा लागणार आहे. विदर्भ आणि मुंबई मधील किमान तापमानात वाढ झाल्याने तेथील थंडीचा जोर कमी झालाय. पुढील काही दिवस राज्यातील तापमान स्थिर असण्याची शक्यता आहे.





