मुंबई : फेब्रुवारीच्या सुरुवातीस राज्यात उन्हाचा कडाका वाढतांना दिसून येत आहे. राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमधील कमाल आणि किमान तापमानात वाढ झालेली बघायला मिळत आहे. पुणे आणि नागपूर येथील कमाल तापमानात बहुतांश वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचबरोबर इतर शहरांत सुद्धा कमाल तापमान हे 32 अंशाच्यावर नोंदवल्या गेले आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये पुढील 24 तासांत तापमान आणि हवामानाची स्थिती कशी असेल पाहुयात.
advertisement
मुंबई शहर आणि उपनगरात मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. 6 फेब्रुवारीला मुंबईतील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
फक्त 30 रुपयांत जेवणाची थाळी, दररोज 700 लोक इथं करतात पोटभर जेवण, PHOTOS
पुण्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झालेली दिसून येत आहे. 6 फेब्रुवारीला पुण्यामधील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील तापमानात देखील वाढ झालेली दिसून येत आहे. 6 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगरमधील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये निरभ्र आकाश असणार आहे. किमान तापमानात आणखी वाढ होऊन उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
नागपूरमधील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. 6 फेब्रुवारीला नागपूरमध्ये मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. पुढील काही दिवसांत नागपूरमधील कमाल तापमान स्थिर राहणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. नागपूरमधील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याने तेथील नागरिकांना उकाडा सहन करावा लागत आहे.
नाशिक मध्ये 6 फेब्रुवारीला मुख्यतः निरभ्र आकाश असणार आहे. नाशिकमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. नाशिकमधील तापमानात देखील पुढील काही दिवसांत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
राज्यातील काही भागांत उन्हाळ्याची चाहूल लागलेली दिसून येत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी उन्हाचे चटके आणि घामाच्या धारा नागरिकांना सहन कराव्या लागतं आहेत. राज्यातून थंडी गायब होऊन आता नागरिकांना उन्हाळ्याचा अनुभव मिळत आहे. पुढील काही दिवसांत कमाल आणि किमान तापमानात वाढ होऊन जोरदार उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.





