शिल्लक घरे कशी मिळणार?
MHADA कडून राबवण्यात आलेल्या 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत काही घरे मागणी कमी असल्यामुळे शिल्लक राहिली आहेत. ही घरे आता ऑनलाइन अर्ज करणाऱ्या आणि पात्र असलेल्या अर्जदारांना जे आधी अर्ज करतील त्यांना आधी घर दिलं जाईल अशा पद्धतीने वाटली जाणार आहेत.
advertisement
अर्ज कधी व कसा करायचा?
अर्जाची सुरुवात 10 एप्रिल 2025 पासून होणार असून https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळवर नोंद करावी.
पूर्णपणे ऑनलाइन नोंदणी असणार आहे. अर्ज करताना लागणारी सर्व माहिती व कागदपत्रं नीट भरावीत आणि अपलोड करावीत.
घरे कुठे आहेत?
विकसकांकडून MHADA ला जेवढ्या घरांची माहिती येईल, त्या त्या वेळेस ती घरे ऑनलाईन यादीत दिसतील. त्यामुळे नागरिकांनी वेळोवेळी वेबसाईट तपासत राहणं महत्त्वाचं आहे.
अधिकाऱ्यांचे आवाहन
MHADA पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे आणि सभापती शिवाजी आढळराव पाटील यांनी सांगितलं की, "ही योजना पारदर्शक आहे आणि गरजू नागरिकांना घर मिळावे यासाठी खास तयार केली आहे. त्यामुळे पात्र लोकांनी जरूर अर्ज करावा."