TRENDING:

पुणे ते संभाजीनगर आता सुस्साट, फक्त 2 तासांत होणार 7 तासांचा प्रवास, गडकरींची मोठी घोषणा!

Last Updated:

Pune to Chhatrapati Sambhajinagar Highway: पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास आता फक्त 2 तासांत होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केलीये.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे: पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास आता सुस्साट होणार आहे. सध्या 6 ते 7 तासांत होणारा प्रवास लवकरच अवघ्या 2 तासांत होईल, अशी माहिती केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीये. 15 हजार कोटी रुपयांच्या खर्चातून केंद्र सरकार पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक नवा महामार्ग बांधणार आहे.  लोकसभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय जाधव यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नाचे उत्तर देताना गडकरी यांनी ही माहिती दिलीये.
पुणे ते संभाजीनगर आता सुस्साट, फक्त 2 तासांत होणार 7 तासांचा प्रवास, केंद्राची मोठी घोषणा!
पुणे ते संभाजीनगर आता सुस्साट, फक्त 2 तासांत होणार 7 तासांचा प्रवास, केंद्राची मोठी घोषणा!
advertisement

पश्चिम महाराष्ट्र – मराठवाड्याला जोडणारा महामार्ग

पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा एक महत्त्वपूर्ण महामार्ग असून त्यामाध्यमातून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडला जाणार आहे. राजधानी मुंबईसोबत संपूर्ण महाराष्ट्र जोडला गेला आहे. तसेच पुण्यासोबत देखील संपूर्ण राज्याचे संबंध आहेत. त्यामुळेच एक नवा महामार्ग बांधण्यात येणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

उन्हाळी सुट्ट्यांसाठी ST चा मोठा निर्णय, 15 एप्रिलपासून पुण्यातून जादा बस

advertisement

View More

2 वर्षात 25 हजार किमी रस्ते चौपदरी

देशातील महामार्गावर होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या 2 वर्षांत 2 पदरी रस्ते चार पदरी तर चार पदरी रस्ते सहा पदरी करण्यात येणरा आहेत. देशातील 25 हजार किलोमीटरचे दुपदरी रस्ते चौपदरी करण्यात येणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

रस्ते अपघात रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न

advertisement

20178 ते 2022 या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 75 हजार रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्गांवर 41 हजार 134 अपघात, तर राज्य महामार्गांवर 33,717 अपघात झाले आहेत. वाहनाचा जास्त वेग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट व सीटबेल्ट न वापरणे, रस्त्यांची खराब स्थिती यामुळे अपघात होतात. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महामार्ग मंत्रालय उपाययोजना राबवत आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
पुणे ते संभाजीनगर आता सुस्साट, फक्त 2 तासांत होणार 7 तासांचा प्रवास, गडकरींची मोठी घोषणा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल