TRENDING:

चक्क ATM मशीनमधून मिळतं दूध, तेही एकदम शुद्ध! पुणेकरांनी लावला शोध

Last Updated:

हे महाराष्ट्रातलं पहिलंच असं एटीएम मशीन आहे जे दूध देतं. 15 लिटरपासून ही दूधविक्री सुरू झाली होती. आज इथं 100 लिटर दुधाची विक्री होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, प्रतिनिधी
advertisement

पुणे : एटीएम म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतं पैशांचं मशीन. पण तुम्ही कधी दुधाचं एटीएम मशीन पाहिलंय का? या एटीएममधून शुद्ध दूध मिळतं, यात कसलीच भेसळ नसते. पण असं मशीन नेमकं कुठे असतं. अहो, पुणे तिथे काय उणे? पुण्यात कात्रज आंबेगावातल्या प्रेस्टिन पॅसिफिक सोसायटीतील 3 मित्रांनी मिळून चक्क दूधाचं एटीएम मशीन तयार केलंय. या मशीनमधून विक्रीसुद्धा सुरू झालीये. विशेष म्हणजे यातून ग्राहकांना शुद्ध आणि चांगल्या प्रतीचं दूध मिळतं.

advertisement

आपण नेहमी घरी जे विकतचं दूध आणतो ते किती प्रक्रिया पार पडल्यानंतर आपल्यापर्यंत पोहोचतं सांगता येत नाही. त्यामुळे त्याची गुणवत्ता किती असते हेही आपण ठामपणे सांगू शकत नाही. हाच विचार करून यावर काहीतरी उपाय म्हणून सचिन इंगवले, अभिषेक पन्हाळे आणि डॉ. मनोजकुमार आवारे या तिघांनी पुण्यातील कात्रज आंबेगाव इथं ही संकल्पना सुरू केलीये. विशेष म्हणजे हे महाराष्ट्रातलं पहिलंच असं एटीएम मशीन आहे जे दूध देतं. 15 लिटरपासून ही दूधविक्री सुरू झाली होती. आज इथं 100 लिटर दुधाची विक्री होते.

advertisement

हेही वाचा : भाजी चिरण्याची विळी ते कैरी कापण्याचा अडकित्ता, या बाजारात स्वस्तात मिळतात लोखंडी वस्तू, Video

View More

मागील 6 महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. सोसायटीतील लोकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. इतर सोसायटीतील लोकांकडूनही इथल्या दुधाला मागणी मिळते. विशेष म्हणजे इथं उरुळी कांचन परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामधून दूध आणलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी 2 टॅंक वापरतात. यात गायीच्या दुधासाठी 100 लिटरचा टँक आणि म्हशीच्या दुधासाठी 300 लिटरचा टँक असतो.

advertisement

हेही वाचा : हमालांचं हाल पाहून बनवली इलेक्ट्रिक हातगाडी, आता ओझं ओढण्याची गरजच नाही!

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कारल्याची भाजी खाऊन कंटाळलात? मग बनवा खास रेसिपी, एकदम खाल आवडीने, Video
सर्व पहा

इथं ग्राहकांना आरएफआयडी कार्ड दिलं जातं. मशीनचं नाव आहे रॉयल 3 मिल्क एटीएम. त्यात पेमेंट ऍड करायचं क्यूआर कोड आहे. एप्लिकेशनच्या माध्यमातून कार्ड रिचार्ज केल्यानंतर ते मशीनवर टॅप करायचं, मग स्क्रिनवर काही पर्याय दिसतात. त्यात गायीचं किती दूध हवं आणि म्हशीचं किती दूध हवं हे निवडल्यानंतर किटलीमध्ये दूध येतं. दरम्यान, हे मशीन बनवण्यासाठी साधारण 5 लाख रुपये इतका खर्च आला. यातून चांगल्याप्रकारे व्यवसाय केला जाऊ शकतो अशी माहिती बीएफ संशोधन विकास प्रतिष्ठानच्या पशू पोषणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मनोज आवारे यांनी दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/पुणे/
चक्क ATM मशीनमधून मिळतं दूध, तेही एकदम शुद्ध! पुणेकरांनी लावला शोध
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल