यंदाची परिस्थिती अधिक संवेदनशील आहे. शहरात महापालिका निवडणुकांचे वारे सुरू असून, प्रचार, बैठका, कार्यकर्त्यांच्या हालचालींमुळे आधीच पोलिस यंत्रणेवर मोठा ताण आहे. त्यातच थर्टी फर्स्टचा जल्लोष असल्याने कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरभर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.
advertisement
पुणे-सोलापूर महामार्गावरील नामांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांनीच पाठवलं गिऱ्हाईक, मग पुढं..
नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील परवानाधारक हॉटेल्स, पब आणि क्लबना मध्यरात्री दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र ध्वनिप्रदूषण, क्षमतेपेक्षा अधिक गर्दी, नियमबाह्य मद्यविक्री किंवा अनुचित प्रकार आढळल्यास संबंधित आस्थापनांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे. परवाना रद्द करणे, दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याचे अधिकार पोलिसांकडे राहणार आहेत.
मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाईसाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझरचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौक, नाकाबंदी ठिकाणी तपासणीदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास वाहन जप्ती, मोठा दंड आणि गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कायद्याचे पालन करून सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने नववर्ष साजरे करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.






