पीएमआरडीए पेठ क्रमांक 12 मधील गृहप्रकल्पात पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे. प्रकल्पात पुरेशी पार्किंगची सोय उपलब्ध नसल्याने रहिवाशांना दररोज अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या प्रमाणात पार्किंग देण्यात आले नसल्यामुळे वाहन पार्क करण्यावरून वादाची परिस्थिती निर्माण होत आहे.
Pimpri News : ....अन्यथा गुन्हा दाखल होणार, पिंपरी चिंचवड महापालिकेचा पाण्यासंदर्भात मोठा निर्णय!
advertisement
दोन ते तीन फ्लॅटसाठी एकच पार्किंग
फ्लॅट धारकांच्या मते, प्रत्यक्षात दोन ते तीन फ्लॅटसाठी केवळ एकच पार्किंगची सोय आहे. या बाबत पीएमआरडीए प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला असला, तरीही काही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. पहिल्या टप्प्यातील फ्लॅटचे वाटप पूर्ण झाले असून, टप्प्याटप्याने घरांचा ताबा दिला जात असल्याने रहिवाशांची संख्या वाढली आणि पार्किंगचा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे.
रहिवाशांनी चुकीच्या पार्किंग आराखड्याबद्दलही प्रशासनावर आरोप केला आहे. पार्किंगच्या समस्येबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती, मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली असली तरी, समस्येवर ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही.
तक्रारीनंतर पीएमआरडीए प्रशासनाने पार्किंगच्या समस्येकडे लक्ष दिलं आहे. सेक्टर 12 येथील पार्किंगचा नकाशा बदलून नव्याने आखणी करण्यात येणार असल्याची माहिती उपअभियंता रश्मी पाटील यांनी दिली. सभासदांच्या तक्रारीनुसार आणि त्यांच्या सूचनांचा विचार करून ही नवीन आखणी करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं