India vs Pakistan u19 Asia Cup 2025 : अंडर 19 आशिया कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 90 धावांनी पराभव केला आहे. खरं तर भारताने 240 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान अवघ्या 150 धावांवर ऑलआऊट झाली होती. त्यामुळे टीम इंडियाने हा सामना 90 धावांनी जिंकला आहे. विशेष म्हणजे भारताने हा सामना जिंकून पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का दिला आहे.त्यामुळे पाकिस्तानला दुहेरी झटका बसला आहे,
advertisement
खरं तर भारताने हा सामना जिंकून आधीच पाकिस्तानला धक्का दिला होता. त्यानंतर दुसरा धक्का भारताने पाकिस्तानला पॉईंटस टेबलमध्ये दिला आहे.कारण या सामन्याआधी पाकिस्तान ग्रुप अ च्या पॉईंटस टेबलमध्ये पहिल्या स्थानी होती. पण आजचा सामना भारताने जिंकल्यामुळे पाकिस्तानला आपले पहिले स्थान गमावले आहे. आता भारत पहिल्या स्थानी आहे.
भारत आता ग्रुप ए मध्ये 2 सामन्यात 4 गुणांसह आणि +3.240 रनरेटसह पहिल्या स्थानी आहे. तर पाकिस्तान 2 सामन्यात 2 गुणांसह आणि +2.070 रनरेटसह दुसऱ्या स्थानी आहे. युएई 2 सामन्यात एक गुणांसह तिसऱ्या तर मलेशिया 2 सामन्यात एकही सामना न जिंकल्याने चौथ्या स्थानी आहे.
कसा रंगला सामना
भारताने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सूरूवात खराब झाली होती. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचं टॉप ऑर्डर कोसळलं होतं.त्यानंतर कर्णधार युसाफ आणि हुसेफा अहसानने पाकिस्तानचा डाव सावरला होता. फरहानने 23 तर हुझेफाने 70 धावांची सर्वाधिक खेळी केली होती.त्याव्यतिरीक्त कुणालाही मोठ्या धावा करता आल्या नाही आणि पाकिस्तानचा डाव 150 धावांवर ऑलआऊट झाला होता.त्यामुळे भारताने हा सामना 90 धावांनी जिंकला.
दरम्यान भारताकडून दिपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहानने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्या होत्या. किशन कुमार सिंहने 2 तर वैभव सूर्यवंशी आणि खिलान पटेलने एक एक विकेट घेतली होती. भारताने प्रथम फलंदाजी करताना 240 धावा केल्या होत्या. भारताकडून आरोन जॉर्जने 85 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. त्याच्या व्यतिरीक्त कनिष्क चौहानने 46 धावांची खेळी केली होती. या बळावर भारताने 240 धावा केल्या होत्या.
