आरक्षणावरून मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षणासाठी दिलेली मुदत संपत आली आहे. या पार्श्वभूमीवर गावा गावात राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलीय. हे लोण राज्यभर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे सर्वचं राजकीय नेत्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागणार आहे.