एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा संघटना आक्रमक झाल्या असतानाच, आता ओबीसींनी देखील सरकारची कोंडी करण्याची तयारी केल्याचं दिसतंय.. मराठा संघटना सत्ताधारी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवतायेत.. तर दुसरीकडे आता ओबीसी नेत्यांनीही सरकारला आरक्षणप्रश्नी भूमिका जाहीर करण्याचं आव्हान देत, घेरल्याचं पाहायला मिळतंय.