यशोमती ठाकूर आणि आमदार राजेश वानखडे यांच्यात आरोप प्रत्यारोप रंगला, यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात कुठलाही उद्योग आणला नाही, त्यांनी फक्त पैसे खाण्याचे काम केलं. त्यांनी दूध डेअरी काढली होती पण त्याची सबसिडी खाल्ली आणि कुठलंच विकास काम केलं नाही,असा आरोप आमदार राजेश वानखडे यांनी केला, यावर काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं, जर मी यशोधरा दूध डेअरीचे पैसे खाल्ले असेल तर तुम्हाला प्रूफ करावं लागेल..नाहीतर बऱ्याच गोष्टी मी तुमच्या प्रूफ करेल. असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला.सरकारी पैसा सरकारी जमीन घेतली असेल तर सिद्ध करून दाखवा...नाहीतर तुमच्या तोंडाला कुलूप लावा असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केला.