मुंबई : २२ सप्टेंबर रोजी घटस्थापना झाली होती. ३० सप्टेंबर रोजी नववी माळ असून २ ऑक्टोबरला दसरा साजरा केला जाणार आहे. त्यामुळे नवरात्राच्या अखेरच्या टप्प्यात दादर फुल मार्केट गर्दीने फुलून गेले आहे. देवीच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांना प्रचंड मागणी असून त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. कालपर्यंत ५० रुपयांना मिळणारी फुलं आता ६० रुपये पाव किलो दराने विकली जात आहेत.