पुणे: सध्या अनेक जण ग्लोबल होण्याच्या मागे लागले आहेत. मोठं होण्यासाठी निसर्गाचा बळी द्यायलाही लोक मागेपुढे पाहत नाहीत. हजारो वर्षे जुनी झाडं तोडून त्याठिकाणी सिमेंटच्या इमारती उभ्या केल्या जात आहेत. खोट्या दिखाव्यासाठी नैसर्गिक सौंदर्य संपवलं जात आहे. वृक्षतोड आणि निसर्ग अतिक्रमणामुळे निसर्गाचा ऱ्हास होत चालला आहे. पण या सगळ्यातही काही जण असे आहेत जे निसर्ग जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी सतत काम करत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पुण्यातील वैष्णवी पाटील. वैष्णवी पाटील ‘झाडांची शेती’ करतात. झाडांची शेती म्हणजे नेमकं काय? याबद्दल त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली आहे.