तब्बल 100 वर्षांनी जुळून आलाय हा योग, या राशींना होणार मोठा फायदा
- Published by:News18 Marathi
Last Updated:
तब्बल 100 वर्षांनी चतुर्ग्रही योग जुळून येणार आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रात काही राशींना मोठा लाभ सांगितला आहे.
नागपूर, 19 ऑक्टोबर: अंतराळात असलेल्या असंख्य ग्रह, तारे, आणि त्याच्यातील होणाऱ्या मार्गक्रमाणाचा व्यक्तीच्या जीवनात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही ना काही परिणाम होत असतो. शिवाय ज्योतिषशास्त्रात या घटनांना फार महत्व आहे. 19 ऑक्टोबर पासून असाच एक दुर्मिळ योग घडून येत आहे. विशेष म्हणजे हा चतुर्ग्रही योग तब्बल 100 वर्षानंतर येत असून काही राशींना मोठा लाभ होणार आहे. याबाबत नागपुरातील ज्योतिष अभ्यासक ज्योतिर्वेद भूषण यांनी माहिती दिलीय.
या काळात मंगळ, केतू, बुध आणि सूर्यग्रह तुळा राशीत येणार आहे त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार होत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार चतुर्ग्रही योग काही राशींना फलदायी ठरणार आहे तर काही राशींसाठी हा योग चिंता वाढविणारा ठरणार आहे. 1923 नंतर यंदा 100 वर्षांनी जुळून आलेला या चतुर्ग्रही योग येत आहे. हा योग काही राशींसाठी फलदायी ठरणार आहे. तर काहींनी उपाय केल्यास त्यांचाही फायदा होईल, असं ज्योतिर्वेद भूषण सांगतात.
advertisement
तब्बल 100 वर्षांनी जुळून आला चतुर्ग्रही योग
चतुर्ग्रही योग हा चार ग्रह मिळून बनणारा योग आहे. तब्बल 100 वर्षानंतर तुळा राशिमध्ये चार महत्त्वाचे ग्रह एकत्र येत आहेत. त्याचा मानवी जीवनावर फार मोठा प्रभाव पडणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मंगळ, केतू, सूर्य आणि बुध असे चार ग्रह एकत्र येत आहेत. हे चार प्रमुख ग्रह तुळा राशीमध्ये भ्रमण करणार आहेत. तुळा राशी ही देवीची असल्याने सध्या नवरात्र सुरू आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांना त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. याच दरम्यानच्या काळात दोन अद्भुत राजयोग देखील होणार आहे. बुधदीप्त योग आणि मंगळ व सूर्याचा मंत्र योग याचा देखील समावेश असून तो अनेकांसाठी फलदायी ठरणार आहे.
advertisement
या राशींना होणार फायदा
यापूर्वी 1923 साली हा योग घडून आला होता. त्यावेळी स्वातंत्र्याला नवी दिशा प्राप्त झाली होती. आता 2023 साली तब्बल 100 वर्षानंतर हा योग जुळून आला आहे. बुधाची मिथुन रास, शुक्राची तुळा रास, शुक्राची वृषभ रास, कर्काची रास या चार राशींसाठी हा कालावधी चांगले फळ देऊन जाणारा ठरेल. या चतुर्गही योगाचा प्रभाव दिवाळीपर्यंत जाणवेल. यामध्ये बुधाची मिथुन राशीच्या लोकांसाठी अडलेली काम होतील, लग्न जुळतील तसेच वैवाहिक जीवनात स्थिरता येईल, एखादे प्रॉपर्टी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ फायदेमंद ठरेल, असंही ज्योतिर्वेद सांगतात.
advertisement
तूळ राशीतील लोकांसाठी वैवाहिक जीवनात फायदा होईल, नवी नोकरी अथवा नोकरीमध्ये प्रमोशन या महिन्यात मिळेल. कोर्ट कचोरीच्या भानगडी असतील तर त्या सुटतील. तर कर्क राशीतील लोकांसाठी मानसिक त्रासांपासून सुटका होईल वैवाहिक जीवनातील त्रास असेल ते सुटका होईल. कोट कचेरीचे मॅटर्स असतील तर त्यांना सुटका होईल. कुंभ राशीतील लोकांसाठी सध्या साडेसाती सुरू असून स्वतः शनिदेव या राशीत उपस्थित आहे. चार नोव्हेंबर पर्यंत तो मार्गी होणार असून कुंभ राशीला याचा फायदा होईल, अशी माहिती ज्योतिर्वेद भूषण यांनी दिली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 19, 2023 10:21 AM IST