Vastu Tips: सुखी-आनंदी कुटुंब! घरात या दिशेला लावलेलं बांबूचं रोप प्रगती-भाग्याच्या मार्गावर आणतं
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vastu Tips Marathi: बांबूचे रोप घरातील वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता आणतं, असं मानलं जातं. मात्र, याचा पूर्ण लाभ ते योग्य दिशा आणि ठिकाणी ठेवले तरच मिळते.
मुंबई : अलिकडे अनेकांच्या घरांमध्ये आणि कार्यालयांमध्ये तुम्ही बांबूची रोपं लावलेली, सजवलेली पाहिली असतील. हे रोप केवळ घराची सुंदरताच वाढवत नाही, तर वास्तुशास्त्रामध्येही याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. बांबूचे रोप घरातील वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता आणतं, असं मानलं जातं. मात्र, याचा पूर्ण लाभ ते योग्य दिशा आणि ठिकाणी ठेवले तरच मिळते. चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास ते शुभऐवजी अशुभ परिणामही देऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप कोठे लावावे आणि त्याचे काय फायदे आहेत, हे जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार, बांबूचे रोप घराच्या ड्रॉईंग रूम किंवा लिव्हिंग रूममध्ये ठेवणे शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम आणि सलोखा टिकून राहतो. हे रोप घरातील वातावरण शांत आणि संतुलित करते. योग्य ठिकाणी ठेवल्यास ते सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि जीवनात सुख-शांती व सौभाग्य घेऊन येते.
बांबूचे रोप कोणत्या दिशेला लावावे - वास्तूनुसार, बांबूचे रोप घर किंवा कार्यालयाच्या पूर्व दिशेला ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते. ही दिशा सूर्याच्या ऊर्जेशी जोडलेली आहे, जी समृद्धी आणि विकासाचे प्रतीक आहे. तसेच उत्तर दिशेला देखील बांबूचे रोप लावणे लाभदायक मानले गेले आहे. बऱ्याच काळापासून आर्थिक अडचणीत असणाऱ्यांनी पूर्व किंवा उत्तर दिशेला बांबूचे रोप लावल्यास धन-संपत्तीत वाढ होऊन आर्थिक स्थिरता येण्यास मदत होते.
advertisement
बांबूच्या रोपाशी संबंधित खबरदारी -
बांबूचे रोप कधीही बाथरूम (न्हाणीघर) किंवा टॉयलेटजवळ ठेवू नये.
ते स्वयंपाकघरात ठेवणे देखील टाळावे.
हे रोप नेहमी स्वच्छ ठिकाणी ठेवावे. अस्वच्छ ठिकाणी ठेवल्यास शुभ फळे मिळत नाहीत.
रोपाला दिलेले पाणी वेळोवेळी बदलत राहावे.
advertisement
लाल रिबनने बांधलेले बांबूचे रोप ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. हे प्रगती आणि यशाचे मार्ग खुले करते.
घरात बांबूचे रोप लावण्याचे फायदे - वास्तुशास्त्रानुसार, योग्य दिशेने लावलेले बांबूचे रोप घरातील आर्थिक स्थिती मजबूत करते आणि अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवते. त्यानं कुटुंबातील लोकांचे नशीब चमकते, नवीन संधी मिळण्यास मदत होते. व्यवसायात प्रगती, यश आणि सौभाग्य वाढवण्यासाठी देखील हे शुभ मानले जाते. बांबूचे रोप हे घरातील वातावरणामध्ये शांती, संतुलन आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 2:09 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vastu Tips: सुखी-आनंदी कुटुंब! घरात या दिशेला लावलेलं बांबूचं रोप प्रगती-भाग्याच्या मार्गावर आणतं