Vinayak Chaturthi 2025: सोमवारच्या विनायक चतुर्थीला अद्भुत संयोग; या पद्धतीनं करा पूजन, विधी, मुहूर्त

Last Updated:

Vinayak Chaturthi 2025: विनायकीच्या दिवशी योग्य विधी करून श्री गणेशाची पूजा केल्यानं कुटुंबात सुख, समृद्धी शांती लाभते. कुंडलीतील कोणताही बुधदोष देखील कमी होतो. या दिवशी लाडक्या गणरायाची पूजा केल्यानं..

News18
News18
मुंबई : संकष्टी प्रमाणेच विनायक चतुर्थीला हिंदू धर्मात महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी अर्थातच नावाप्रमाणे विनायकाची म्हणजेच गणरायाची पूजा केली जाते. शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायकी साजरी केली जाते. विनायकीच्या दिवशी योग्य विधी करून श्री गणेशाची पूजा केल्यानं कुटुंबात सुख, समृद्धी शांती लाभते. कुंडलीतील कोणताही बुधदोष देखील कमी होतो. या दिवशी लाडक्या गणरायाची पूजा केल्यानं अनेक इच्छा पूर्ण होतात. नोव्हेंबरची विनायक चतुर्थी कधी साजरी होईल, पूजेचा शुभ मुहूर्त, या दिवशी भगवान गणेशाची पूजा कशी करावी, याविषयी आपण जाणून घेऊया.
नोव्हेंबरमध्ये विनायक चतुर्थी -
हिंदू कॅलेंडरनुसार, मार्गशीर्ष शुक्ल चतुर्थी तिथी 24 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11:04 वाजता सुरू होईल. ती 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 1:12 वाजता संपेल. कॅलेंडरनुसार, विनायक चतुर्थी 24 नोव्हेंबर रोजी साजरी केली जाईल आणि या दिवशी संकष्टीचा उपवास करणं शुभ फळदायी मानलं जातं. या दिवशी सकाळी 11:04 ते दुपारी 1:12 पर्यंत गणपतीची पूजा करण्याचा शुभ काळ आहे. या शुभ काळात गणपतीची पूजा करणे विशेष फायदेशीर ठरेल.
advertisement
विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा कशी करावी - या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठा, स्नान करा आणि शक्यतो लाल कपडे घाला. पूजास्थळ स्वच्छ करा आणि व्रत करण्याचा संकल्प करा. पूजा करताना गणेशाची मूर्ती किंवा फोटो वेदीवर ठेवा. देवासमोर तुपाचा दिवा लावा. त्यानंतर, गणेशाला अष्टगंध, तांदळाचे दाणे, लाल फुले आणि दुर्वा अर्पण करा. तसेच, भगवान गणेशाला लाडू किंवा मोदक अर्पण करा. पूजेदरम्यान "ॐ गं गणपतये नमः" हा मंत्र शक्य तितका जप करत राहावा. त्यानंतर, विनायक चतुर्थी व्रत कथा पठण करा किंवा ऐका. गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीची पाने वापरली जात नाहीत. पूजेनंतर, बाप्पाची एकत्रित आरती करा आणि लोकांना प्रसाद वाटा.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vinayak Chaturthi 2025: सोमवारच्या विनायक चतुर्थीला अद्भुत संयोग; या पद्धतीनं करा पूजन, विधी, मुहूर्त
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement