राहू-केतू करणार या राशींमध्ये भ्रमण, पाहा कोणाला होणार फायदा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या भ्रमानामुळे 5 राशींतील लोकांना त्याचा फार मोठा परिणाम दिसून येणार आहे.
नागपूर, 20 ऑक्टोबर : ज्योतिष शास्त्रात प्रत्येक ग्रहाचे आपले असे खास महत्त्व असुन काळानुरूप काही ठराविक काळानंतर हे ग्रह आपली राशीतील स्थान बदलत असतात. ज्योतिष शास्त्रनुसार ग्रहांच्या या भ्रमनाचा मानवी जीवनावर देखील परिणाम होत असतो. येत्या 30 ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण समजले जाणारे राहू-केतू दुसऱ्या राशींमध्ये प्रवेश करणार आहेत. या भ्रमानामुळे 5 राशींतील लोकांना त्याचा फार मोठा परिणाम दिसून येणार आहे. 18 महिन्याच्या कालावधीनंतर होणारे राहू-केतूचे भ्रमण अनेक लोकांच्या जीवनात चांगले फळ देऊन जाईल. या राशीं कोणत्या आणि त्याचे काय लाभ होतील या बद्दल नागपुरातील ज्योतिषशास्त्र अभ्यासक ज्योतिर्वेद डॉ. भूषण यांनी अधिक माहिती दिली आहे.
राहू- केतू करतील या राशींमध्ये भ्रमण
ज्योतिष शास्त्रात ग्रहांच्या भ्रमणाचा आणि गोचरीचा अनन्यसाधारण परिणाम व्यक्तींच्या जीवनावर आढळून येतो. ग्रह राशी बदलतात किंवा परिवर्तन करतात तेव्हा त्याचा मानवी जीवनावर फार मोठा अमुलाग्र बदल जाणवत असतो. मनुष्य जीवनावर प्रभाव टाकणारे जे महत्त्वाचे ग्रह आहेत त्याचा खोलवर परिणाम मानवी जीवनावर होतो त्यातील प्रमुख असे ग्रह म्हणजे शनी, गुरु, राहू आणि केतू हे आहेत. लाहेरी पंचांगानुसार आगामी 30 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4 वाजून 46 मिनिटांनी राहू मेष राशीमधून निघून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे, तर केतू तुला राशीमधून निघून कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. या प्रमाणाचा प्रभाव 18 मे 2025 पर्यंत राहणार आहे, असं ज्योतिर्वेद भूषण सांगतात.
advertisement
पाच राशींना होणार फायदा
राहू-केतूच्या भ्रमणामुळे पाच राशींना त्याचा फार मोठा परिणाम जाणवणार आहे. त्यातील पहिली रास आहे मेष राशी. मेष राशीमध्ये मागच्या वर्षी गुरु राहू यांचा चंडाळ योग होता. त्यामुळे मेष राशीतील लोकांना या चंडाळ योगामुळे नकारात्मक परिणाम जाणवत होते. मेष राशीमधून राहू देव निघाल्यामुळे मेष राशीतील लोकांना आगामी काळ हा अतिशय फलदायी ठरणार आहे. राहू भ्रमणामुळे प्रभावित असणारी दुसरी रास म्हणजे कर्क होय. कर्क राशीमध्ये गुरुदेव उंचीच्या स्थानी असल्यामुळे आणि गुरू चंडाळ योगमुळे गुरु आपल्या सकारात्मक परिणाम कर्क राशीतील लोकांना देऊ शकत नव्हता. आता गुरु आणि चंडाळ योग सुटून राहू राशीतील लोकांना चांगले दिवस येणार आहेत. या दिवसात गुरुची कृपा कर्क राशीतील लोकांवर असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे कर्क राशीतील हे भ्रमण फार महत्त्वाचे ठरणार आहे, असंही ज्योतिर्वेद भूषण सांगतात.
advertisement
गंगा नदीच्या मातीतून साकारलीय दुर्गा, गरुड पुराणावर आधारित देखावा पाहिलात का?
राहू-केतु भ्रमणामुळे प्रभावित असणारी तिसरी सिंह रास आहे. सिंह राशीच्या लोकांमध्ये गुरुची कृपा राहूदेवामुळे मिळत नव्हती. मात्र आगामी काळात या भ्रमणामुळे गुरुची कृपा सिंह राशीतील लोकांवर कायम राहणार आहे. सिंह राशीत गुरुची कृपा असल्याने कोर्टकचेरी,व्यवसाय, यातील अडलेले काम पूर्ण होणार आहे. यातील चौथी रास आहे तुला रास. मागच्या दीड वर्षापासून तुला राशीमध्ये केतू देव असल्याने या राशीच्या लोकांमध्ये वैवाहिक जीवनात असमाधान होते. मात्र आता केतू देव निघाल्याने या राशीला चांगले फळ मिळणार आहे. यानंतरची रास मीन रासअसून सध्या मीन रासमध्ये स्वतः गुरुदेव विराजमान असल्याने या राशीतील लोकांचे थांबलेले काम आता पूर्ण होणार आहे. शिवाय या राशीतील लोकांना साडेसातीमुळे अनेक संकटांना सामना करावा लागला होता यापुढे आता या मीन राशीतील लोकांची सुटका होऊन चांगल्या गोष्टी घडणार आहेत,अशी माहिती ज्योतिर्वेद भूषण यांनी दिली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
October 20, 2023 10:35 AM IST