Shravan Somwar 2025: साडेसातीचा मार ओसरतो! श्रावणातील सोमवारी पिंडीवर या गोष्टी अर्पण करा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shravan Astrology: साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी श्रावणात दररोज किंवा विशेषतः श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा, मध, साखर, दही, तूप, गंगाजल इत्यादी अर्पण करून अभिषेक करावा. 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास...
मुंबई : मराठी श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे. शुक्रवार 25 जुलैपासून श्रावणाला सुरुवात होईल. सध्या शनिची साडेसाती भोगत असलेल्या लोकांनी श्रावणात विशेष पूजा-अर्चा करावी. साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी श्रावण महिन्यात काही विशिष्ट उपाय करणे ज्योतिषशास्त्रानुसार फायदेशीर मानले जाते. श्रावण महिना शंकराला समर्पित असल्यामुळे या काळात शिवाची उपासना करणे विशेष फलदायी ठरते.
साडेसातीचा त्रास कमी करण्यासाठी श्रावणात दररोज किंवा विशेषतः श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जल, दूध, बेलपत्र, धतुरा, मध, साखर, दही, तूप, गंगाजल इत्यादी अर्पण करून अभिषेक करावा. 'ओम नमः शिवाय' या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास, श्रावणात रुद्राभिषेक करावा. यामुळे शनिदेवाचा प्रकोप शांत होतो असे मानले जाते. महामृत्युंजय मंत्राचा नियमित जप केल्याने आरोग्य, दीर्घायुष्य आणि मानसिक शांती मिळते, तसेच संकटांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. शिव चालीसा आणि शिव तांडव स्तोत्राचे पठण करणे देखील शुभ मानले जाते.
advertisement
शनिदेवाची उपासना:
शनिदेवाचा मंत्र 'ओम शं शनैश्चराय नमः' या मंत्राचा जप करावा. शनिवारी शनि मंदिरात जाऊन शनिदेवाचे दर्शन घ्यावे आणि मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनि स्तोत्राचे पठण केल्याने शनिदेवाचा प्रकोप शांत होतो, असे मानले जाते. शनिवारी काळे तीळ, उडीद डाळ, काळे वस्त्र, लोखंडी वस्तू किंवा मोहरीचे तेल दान करणे, शुभ मानले जाते.
advertisement
गरजू आणि गरिबांना मदत करणे, त्यांना अन्नदान करणे किंवा त्यांची सेवा करणे हे शनिदेवांना प्रसन्न करते असे मानले जाते. पिंपळाचे झाड लावणे आणि त्याची सेवा करणे, हे देखील शनिदेवाच्या कृपेसाठी चांगले मानले जाते. श्रावण महिन्यात नियमितपणे पूजा, ध्यान आणि आध्यात्मिक कार्यात मन रमवल्यास मानसिक शांती मिळते आणि साडेसातीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. साडेसाती हा कर्मानुसार फळ देणारा काळ असतो. त्यामुळे या काळात सकारात्मक विचार ठेवा आणि आपल्या कर्माकडे लक्ष केंद्रित करा.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 19, 2025 12:14 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shravan Somwar 2025: साडेसातीचा मार ओसरतो! श्रावणातील सोमवारी पिंडीवर या गोष्टी अर्पण करा