Surya Grahan: 2 ऑगस्टला दिवसा होणार रात्र! पूर्ण 6 मिनिट सूर्य गायब; पुन्हा 100 वर्षांनी असा दुर्मीळ नजारा

Last Updated:

Solar Eclipse : दिवसा अचानक सूर्य ६ मिनिटं अदृश्य झाला तर खरोखरच सर्वांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. ही एक काल्पनिक कथा नसून असं प्रत्यक्षात घडणार आहे. सूर्यग्रहण जास्त वेळ असेल आणि सर्वत्र रात्रीसारखा अंधार दिसू शकतो..

News18
News18
नवी दिल्ली :  दिवसा अचानक काळाकुट्ट अंधार पडला तर कसं वाटेल ना? आणि तेही पूर्ण ६ मिनिटं. दिवसा अचानक सूर्य ६ मिनिटं अदृश्य झाला तर खरोखरच सर्वांना आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे. ही एक काल्पनिक कथा नसून असं प्रत्यक्षात घडणार आहे. २ ऑगस्ट २०२७ रोजी पूर्ण सूर्यग्रहण होणार आहे. या पूर्ण सूर्यग्रहणामुळे संपूर्ण आकाश दिवसा अंधारात बुडेल. असे सूर्यग्रहण पुन्हा पुढील १०० वर्षांपर्यंत दिसणार नाही. जगातील विविध खंडांवर राहणाऱ्या कोट्यवधी लोकांना हे दृश्य पाहता येणार आहे. असं सूर्यग्रहण पुन्हा २११४ साला पर्यंत पुन्हा दिसणार नाही.
हे सूर्यग्रहण अटलांटिक महासागरापासून सुरू होईल. नंतर ते जिब्राल्टरच्या सामुद्रधुनी, दक्षिण स्पेन, उत्तर मोरोक्को, उत्तर अल्जेरिया, उत्तर ट्युनिशिया, ईशान्य लिबिया, इजिप्त, सुदान, नैऋत्य सौदी अरेबिया, येमेन, सोमालिया आणि अरबी द्वीपकल्पातील इतर देशांमध्ये दिसत जाईल. हिंदी महासागरावर ते अस्पष्ट दिसू लागेल. इतिहासातील सर्वात मोठे पूर्ण सूर्यग्रहण ७ मिनिटे २८ सेकंद चालले होते, ते इ.स.पू. ७४३ मध्ये झाले.
advertisement
या सूर्यग्रहणाला 'ग्रेट नॉर्थ आफ्रिकन एक्लिप्सन' असेही म्हटले जात आहे. याचे कारण म्हणजे ते आफ्रिकेतील बहुतेक देशांमधून दिसेल. बहुतेक सूर्यग्रहणे ३ मिनिटांपेक्षा कमी काळ असतात, परंतु २ ऑगस्ट २०२७ रोजी होणाऱ्या पूर्ण सूर्यग्रहणामुळे जगातील अनेक भाग पूर्ण ६ मिनिटे अंधारात बुडालेला पाहायला मिळेल.
advertisement
एवढ्या मोठ्या सूर्यग्रहणाचे कारण काय?
याचे कारण म्हणजे सूर्य-चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील दुर्मीळ खगोलीय संरेखन. इतक्या मोठ्या सूर्यग्रहणाची तीन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे पृथ्वी सूर्यापासून सर्वात दूर अंतरावर असेल. याला अपसौर म्हणतात. यामुळे, सूर्य पृथ्वीपासून लहान दिसेल. त्याच वेळी, चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असेल, ज्यामुळे तो मोठा दिसेल. तिसरे म्हणजे, चंद्राची सावली विषुववृत्तावर पडेल आणि सावली हळूहळू वाढेल.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Surya Grahan: 2 ऑगस्टला दिवसा होणार रात्र! पूर्ण 6 मिनिट सूर्य गायब; पुन्हा 100 वर्षांनी असा दुर्मीळ नजारा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement