Bike: तुमची बाइक कायमची पडू शकते बंद, इंजिनचं निघेल मोठं काम, हा पार्ट बदलला का?
- Published by:sachin Salve
Last Updated:
जर तुम्ही बाइकच्या सर्व्हिसकडे दुर्लक्ष केलं तर प्रचंड नुकसान होऊ शकतं. नियमित सर्व्हिस केल्याामुळे दुचाकीच्या बॉडीपासून ते इंजिन हे चांगलं राहतं
जर तुम्हाला तुमच्या बाइक आणि कारने चांगलं मायलेज दिलं पाहिजे असं वाटत असेल तर तिची वेळेवर सर्व्हिस करणे गरजेचं आहे. जर तुम्ही बाइकच्या सर्व्हिसकडे दुर्लक्ष केलं तर प्रचंड नुकसान होऊ शकतं. नियमित सर्व्हिस केल्याामुळे दुचाकीच्या बॉडीपासून ते इंजिन हे चांगलं राहतं आणि बाइक कुठे बंदही पडत नाही. पण बाइकचा एक एक पार्ट हा महत्त्वाचा असतो. एअर फिल्टर सारखा पार्ट हा वेळेवर स्वच्छ करणे गरजेचं आहे. एअर फिल्टर असा पार्ट आहे जो वेळेवर क्लीन केला नाही तर याचा परिणाम इंजिन आणि बाइकच्या परफॉरमेन्सवर लगेच दिसून येईल
एअर फिल्टर कसं साफ करायचं?
एअर फिल्टर साफ करणे हे अत्यंत गरजेचं असतं. हे साफ करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गॅरेजवाल्याकडे जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी सुद्धा फिल्टर साफ करू शकतात. पण जर तुम्ही गॅरेजमध्ये घेऊन मॅकेनिककडून फिल्टर साफ करून घेतलं तर तो चांगला पर्याय असेल. फिल्टर साफ केल्यामुळे मायलेजमध्ये फरक पडतो. इंधनाची कपात कमी होते आणि बाइकचं चांगलं मायलेज मिळतं.
advertisement
प्रत्येक बाइकमध्ये मॅन्युअल दिलेलं असतं त्यानुसार सर्विस कधी झाली पाहिजे हे स्पष्ट लिहिलेलं असतं. जर 2500-3000 किमी बाइक चालवल्यानंतर बाइकच्या सर्विसिंगमध्ये एअरफिल्टरची सफाई केली पाहिजे. एअर फिल्टर हे 50,000 किलोमीटर बाइक चालवल्यानंतर बदलणे गरजेचं आहे. जर यामध्ये बिघाड झाला तर इंजिनमध्ये हवेचा प्रवाह त्रासदायक ठरू शकतो.
या शिवाय इंधनाचा योग्य प्रवाह होत नसेल मायलेजवर त्याचा परिणाम होतो. खराब फिल्टरमुळे इंजिनमध्ये धूळ आणि माती जमा होण्याची भीती असते, त्यामुळे बाइकचं मोठं नुकसान होऊ शकतं. बाइक काळा धूर बाहेर फेकू शकतं. नेहमी लोक हे एका छोट्याशा पार्टसाठी दुर्लक्ष करतात. पण एका एअरफिल्टरमुळे बाइकचा परफॉर्मन्स खराब करू शकतो. सोबत मायलेजही कमी होईल. एअरफिल्टरसह इतरही बाइकमधील पार्ट हे महत्त्वाचे असतात, त्यामुळे वेळेवर बाइकची सर्विसिंग करत राहा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2025 10:14 PM IST