Driving License: फेल, फेल, फेल! नापास झाल्यानंतर किती वेळा देते येते ड्रायव्हिंगची परीक्षा?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Driving License: नापास झाल्यानंतर किती दिवसांनी पुन्हा परीक्षा देता येते? दंड भरावा लागतो का? सोप्या भाषेत समजून घ्या नियम
मुंबई: बऱ्याचदा असं होतं की ड्रायव्हिंग शिकल्यानंतर परीक्षा देताना मात्र तारांबळ उडते. परीक्षेदरम्यान छोटीशी चूक झाली तरी फेल केलं जाऊ शकतं. मग अशा वेळा आपल्याला कितीवेळा ही परीक्षा देता येते, त्यासाठी काय नियम आहे हे माहिती असणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO कडून घेतल्या जाणाऱ्या टेस्टमध्ये जर एखादा उमेदवार नापास झाला, तर त्याला लायसन्स लगेच मिळत नाही, पण याचा अर्थ तो पुन्हा देऊ शकणार नाही असं नाही. "एकदा नापास झालात म्हणून लायसन्स मिळणार नाही" असा कोणताही नियम सरकारने केलेला नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
किती वेळा टेस्ट देता येते?
परिवहन विभागाच्या नियमानुसार, उमेदवार ड्रायव्हिंग टेस्टमध्ये पास होईपर्यंत कितीही वेळा परीक्षा देऊ शकतो. मात्र, दर वेळी परत टेस्ट देण्यासाठी फी भरावी लागते. सामान्यतः, एका टेस्टनंतर दुसरी टेस्ट देण्यासाठी किमान ७ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. ज्यावेळी एखादा उमेदवार नापास होतो, तेव्हा RTO कडून स्पष्ट सांगितलं जातं की कोणत्या प्रकारच्या चुकांमुळे तो नापास झाला. त्यामुळे अशा वेळी गरज असते ती प्रॅक्टिस वाढवण्याची आणि त्या चुका सुधारण्याची.
advertisement
लर्निंग लायसन्सची वैधता किती?
लर्निंग लायसन्सची वैधता ६ महिने असते. त्याच दरम्यान उमेदवाराला टेस्ट पूर्ण करून पर्मनंट लायसन्स मिळवायचा असतो. नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालवल्यास ५,००० रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. पूर्वी ही रक्कम केवळ ५०० रुपये होती. सरकारने ही दंडाची रक्कम १० पट वाढवली आहे.
advertisement
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?
ड्रायव्हिंग लायसन्ससाठी खालील स्टेप्स फॉलो करा
sarathi.parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा
तुमचे राज्य निवडा
"Learner License" किंवा "Driving License" पर्याय निवडा
आधार कार्डद्वारे अर्ज भरा
मोबाईल OTPद्वारे तपासणी करा
आवश्यक माहिती भरा आणि शुल्क भरा
लर्निंग लायसन्ससाठी ऑनलाईन टेस्ट द्या
advertisement
ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं म्हणजे केवळ कागदावर मिळवलेलं पात्रता प्रमाणपत्र नाही, तर तो तुमच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा अधिकार आहे. त्यामुळे, चूक झाल्यास घाई करू नका, सराव वाढवा आणि आत्मविश्वासाने पुढचा प्रयत्न करा. तुम्ही कितीही वेळा परीक्षा देऊ शकता मात्र त्यासाठी तुम्हाला मध्ये सरावासाठी वेळ दिला जातो. एकदा परीक्षा दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी परीक्षा देता येत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 08, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Driving License: फेल, फेल, फेल! नापास झाल्यानंतर किती वेळा देते येते ड्रायव्हिंगची परीक्षा?