Traffic Challan Rule: वेळेवर ट्रॅफिक चालान न भरल्यास बसणार मोठा दंड, जाणून घ्या नवे नियम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तर प्रदेशमध्ये ब्रजेश नारायण सिंह यांच्या आदेशानुसार, ई-चालान एक महिन्यात न भरल्यास 5 ते 10 टक्के विलंब शुल्क लागेल. व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोटीस मिळेल.
बाईक असो किंवा कार, असो चालान आल्यावर नंतर भरु म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता जर तुमचे वाहन चालान ऑनलाईन कापलं गेलं असेल, तर ते एका महिन्याच्या आत भरणं बंधनकारक आहे. जर तुम्ही वेळेत चालान भरले नाही, तर तुम्हाला मूळ रकमेवर लेट पेनल्टी भरावी लागेल.हा नवा नियम आता लागू करण्यात आला आहे.
विलंब शुल्क आकारले जाणार
परिवहन आयुक्त ब्रजेश नारायण सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 ऑगस्टपासून चालान वसुलीची ही नवीन व्यवस्था लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार, चालान कापल्यानंतर एका महिन्याच्या आत ते न भरल्यास, चालानच्या रकमेच्या 5 ते 10 टक्के विलंब शुल्क आकारले जाईल. म्हणजेच, जर तुमचे 1,000 रुपयांचे चालान असेल, तर त्यावर तुम्हाला 50 ते 100 रुपयांपर्यंत अतिरिक्त दंड भरावा लागेल. उत्तर प्रदेश परिवहन विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
मोबाईलवर थेट चालानची सूचना
आता परिवहन विभाग व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून ई-चालानची नोटीस थेट वाहन मालकांच्या मोबाईलवर पाठवत आहे. पहिल्या टप्प्यात जानेवारी 2024 ते जुलै 2025 या कालावधीतील चालानची माहिती पाठवली जात आहे. त्यानंतर, 2020 आणि 2023 मधील प्रलंबित चालानची माहितीही पाठवली जाईल. या चॅटबॉटद्वारे तुम्ही स्वतःचे चालान तपासू शकता.
चालान भरणे झाले सोपे
उत्तर प्रदेश सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी 'ई-चालान' (e-Challan) प्रणाली सुरू केली आहे. यामुळे वाहन मालकांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या echallan.parivahan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुमचे चालान तपासू शकता आणि ते ऑनलाइन भरू शकता.
advertisement
चालान कसे भरावे?
सर्वात आधी echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा.
'चेक चालान स्टेटस' चेक युअर चालनवर क्लिक करा.
तुम्हाला तीन पर्याय मिळतील: चालान नंबर, वाहन नंबर किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नंबर.
योग्य पर्याय निवडा आणि आवश्यक माहिती भरा.
तुमच्या वाहनावरील सर्व चालान स्क्रीनवर दिसतील.
ज्या चालानचे पैसे भरायचे आहेत, त्याच्या समोर Pay Now वर क्लिक करा.
advertisement
नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा UPI द्वारे पेमेंट करा.
पेमेंट यशस्वी झाल्यावर तुम्हाला एक ऑनलाइन पावती मिळेल, ती डाउनलोड करून घ्या.
या नव्या नियमांमुळे वाहतूक नियमांचे पालन करणे आणि चालान वेळेवर भरणे नागरिकांसाठी अधिक महत्त्वाचे झाले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 22, 2025 2:13 PM IST
मराठी बातम्या/ऑटो/
Traffic Challan Rule: वेळेवर ट्रॅफिक चालान न भरल्यास बसणार मोठा दंड, जाणून घ्या नवे नियम


