HSRP Number Plate: मुंबईकर वेटिंगवर, 10 दिवसानंतरही मिळेना एचएसआरपी नंबर प्लेट
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
HSRP Number Plate: राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आलेय. मुंबईकरांना मात्र नाहक त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
मुंबई : राज्यात 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बसविण्याचा आदेश सरकारने काढला आहे. परंतु, वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. मुंबई महानगर प्रदेशात तर एचएसआरपी बसविण्यासाठी अपॉइंटमेंट मिळणेच कठीण होतेय. मोठ्या प्रयत्नांनी अपॉइंटमेंट मिळाली तरी नंबरप्लेट वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना फिटमेंट सेंटरच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जातोय.
नोंदणीसाठी वेटिंग
मुंबईत एचएसआरपी नंबर प्लेटसाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी होत आहे. परंतु, मोजकेच स्लॉट उपबल्ध असल्याने वेटिंग लिस्ट मोठी आहे. पालघर परिसरात प्रतीक्षा यादी मोठी असल्याने काहींनी भाईंदरला अपॉईंटमेंट घेतली. परंतु, तिकडेही निराशाच पदरी पडल्याचे वाहनचालक सांगत आहेत. नोंदणीला 10 दिवस झाल्यानंतर प्लेट बसवण्याची वेळ दिली जाते. परंतु, सेंटरवर गेल्यानंतर अनेकांना हात हालवतच परत यावे लागत आहे.
advertisement
बुकिंग नतंरही HSRP नाही
काही ठिकाणी ऑनलाईन बुकिंग करून देखील एचएसआरपी नंबरप्लेट मिळत नाहीत. एजन्सीने पुरवलेल्या प्लेट वेळेवर केंद्रावर पोहोचत नाहीत. त्यामुळे फिटमेंट सेंटरवर वाहनचालाकांना ताटकळत थांबावे लागतेय. तर सेंटरचालकांकडून बऱ्याचदा दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं जातंय. वेळेवर नंबरप्लेट मिळत नसल्याने वाहन मालकांची गैरसोय होतेय. त्यामुळे शासनाने या प्रकरणात त्वरीत तोडगा काढण्याची मागणी होतेय.
advertisement
HSRP साठी मुदतवाढ
एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहन मालकांना 31 मार्च 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु, अनेक वाहनधारकांची नंबर प्लेट बसवणे बाकी होते. त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. आता 30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 11, 2025 10:04 AM IST