Hyundai करतेय स्टॉक क्लिअर, 631 किमी रेंजच्या कारवर 4 लाखांचा डिस्काउंट, यात येईल आणखी एक कार!

Last Updated:

जर तुम्हाला ईलेक्ट्रिक कार विकत घ्यायची असेल तर मे महिन्यात ही चांगली संधी आहे. कारण मे महिन्यात अनेक कंपन्यांकडून दमदार अशा ऑफर्स दिल्या जात आहे.

News18
News18
जर तुम्हाला ईलेक्ट्रिक कार विकत घ्यायची असेल तर मे महिन्यात ही चांगली संधी आहे. कारण मे महिन्यात अनेक कंपन्यांकडून दमदार अशा ऑफर्स दिल्या जात आहे. एवढंच नाहीतर पेट्रोल आणि डिझेल गाड्यांवरही ऑफरचा वर्षावर सुरू आहे. पण ईव्ही गाड्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट दिला जात आहे. हुंदई मोटर्सकडून ioniq 5 या हायटेक मिड एसयुव्हीवर सगळ्यात जास्त डिस्काउंट दिला आहे. ही कार फुल चार्ज केल्यावर 631 किलोमीटर इतकी रेंज आहे.
Hyundai कंपनीने आपल्या ioniq 5 वर ४ लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर सुरू आहे. डिलरशीपकडून ioniq 5 चा जुना स्टॉक क्लिअर केला जात आहे. त्यामुळे मे महिन्यात हुंडई ioniq 5 ही MY2024 मॉडल विकत घेतल्यावर 4 लाख रुपये इतका डिस्काउंट दिला आहे. ही ऑफर जाणून घेण्यासाठी तुम्ही जवळच्या हुंदई डिलरशीपमध्ये जाऊन चौकशी करू शकतात. ioniq 5ची किंमत एक्स-शोरूम 46.05 लाख रुपये इतकी आहे.
advertisement
631 किमी रेंज
ioniq 5 मध्ये 72.6kWh ची बॅटरी दिली आहे. जी 217bhp इतकी पॉवर आणि 350Nm इतका टॉर्क जनरेट करते. सिंगल चार्जवर 631 किलोमीटर इतकी रेंज ही कार देते. ही EV 150kWh चार्जरच्या मदतीने फक्त 21 मिनिटांमध्ये 0 ते 80%  टक्के चार्ज होईल. तर 50kWh चार्जरवर ही कार १ तासांमध्ये फुल चार्ज होईल.
advertisement
लांबच्या प्रवासासाठी बेस्ट
या कारमध्ये फिचर्स एकापेक्षा एक असेच  आहे  6-एअरबॅग, 360-डिग्री कॅमेरा आणि अडव्हांस्ड ड्रायव्हर अस्सिटेंट सिस्टम (ADAS) सारखे फिचर्स दिले आहे.  या शिवाय या कारमध्ये 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरमिक सनरूफ आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट दिले आहे. ही एख बेस्ट अशी इलेक्ट्रिक कार आहे जी अडव्हॉन्स फिचर्सने सज्ज आहे. रोजच्या वापरासाठी आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही कार बेस्ट आहे.
advertisement
जर तुमचा शहरामध्ये वापर असेल तर ही कार एक चांगला ऑप्शन आहे. पण या कारची किंमत थोडी जाास्त आहे. ज्यामुळे तुम्हाला या कारसाठी जास्त पैसे मोजावे लागेल .पण या कारची रेंज ही सगळ्यात जास्त आहे. मार्केटमध्ये इतक कोणत्याही कंपनीची कार इतकी रेंज ऑफर करत नाही. पण किंमत जास्त असल्यामुळे ही कार खरेदी करण्यासाठी हुंदईकडे मर्यादीत आणि एक विशिष्ट वर्गाचे ग्राहक सध्या उपलब्ध आहे. जर हीच कार कमी किंमतीत असती तर मार्केटमध्ये एकच हवा केली असती.
मराठी बातम्या/ऑटो/
Hyundai करतेय स्टॉक क्लिअर, 631 किमी रेंजच्या कारवर 4 लाखांचा डिस्काउंट, यात येईल आणखी एक कार!
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement