Hyundai टाकणार मोठा डाव, भारतात आणतेय पॉवरफुल Car, मारुतीला देणार टक्कर!

Last Updated:

हुंदईने आणखी एक मेगाप्लॅन केला आहे. हुंदईने २०३० च्या अखेरीस २६ नवीन कार लाँच करण्याचं प्लॅनिंग केलं आहे.

News18
News18
भारतीय मार्केटमध्ये सध्या एकापेक्षा एक अशा SUV आणि कारची चलती आहे. तर दुसरीकडे कोरियन कंपनी हुंदईने क्रेटासारखी SUV ने भारतीय मार्केटमध्ये दबदबा निर्माण केला आहे. आता  हुंदईने आणखी एक मेगाप्लॅन केला आहे. हुंदईने २०३० च्या अखेरीस २६ नवीन कार लाँच करण्याचं प्लॅनिंग केलं आहे. या काळात ह्युंदाई आपल्या नवीन एसयूव्हीसह मारुतीला कडक टक्कर देणार आहे. हुंदई लवकरच भारतात
hyundai bayon ही दमदार इंजिनसह लाँच करण्याची तयारी केली आहे.
हुंदई भारतात एक क्रॉसओवर एसयूव्ही लाँच करणार आहे जी मारुती फ्रॉन्क्सशी स्पर्धा करेल. hyundai bayon असं तिचं नाव असणार आहे जी आय२० हॅचबॅकवर तयार केली आहे. hyundai bayon ही I20 या कारवर आणि क्रेटाच्या खाली असणार आहे.  या कारमध्ये नवीन १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. इंजिन किती ताकदीचं आहे, याचे आकडे अद्याप समोर आले नाही. पण या इंजिनला डीसीटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. याशिवाय, १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील हायब्रिड-रेडी असेल, ज्यामुळे मागणी वाढल्यास ब्रँड हायब्रिड पॉवरट्रेन देखील वापरू शकेल. याशिवाय, एसयूव्हीमध्ये १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील मिळण्याची शक्यता आहे. तथापि, १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनचे पॉवर आउटपुट सध्याच्या इंजिनसारखेच असेल की नाही हे निश्चित झालेले नाही.
advertisement
2 टर्बो पेट्रोल इंजिन
सध्या, हुंदईकडे दोन टर्बो पेट्रोल इंजिन आहेत. एक १.०-लिटर टर्बो पेट्रोल आणि एक १.५-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन. १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन ११८bhp आणि १७२Nm पॉवर जनरेट करते.  जे i20 आणि व्हेन्यूसह येतं. तर मोठे १.५-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन १५८bhp आणि २५३Nm उत्पादन करते.  जे व्हेर्ना, क्रेटा आणि अल्काझारसह येते. ह्युंदई i20 किंवा व्हेन्यूसह नवीन १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देते का हे पाहणे ठरणार आहे.
advertisement
hyundai bayon कधी लाँच होईल?
हुंदई जवळपास २६ गाड्या लाँच करणार आहे  hyundai bayon ही यामधीलच एक कार आहे.
hyundai bayon ही i20 वर आधारित क्रॉसओवर एसयूव्ही असणार आहे. नवीन मारुती सुझुकी F-100 प्रतिस्पर्धी जागतिक स्तरावर १०.२५-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १०.२५-इंच टचस्क्रीन सिस्टम, ८-स्पीकर BOSE साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग आणि ADAS सारख्या फिचर्ससह ऑफर केली जाते.
advertisement
hyundai bayon भारतात ह्युंदाईसाठी गेम-चेंजर एसयूव्ही ठरू शकते. तिची विक्री प्रामुख्याने क्रेटावर अवलंबून आहे आणि बायोन परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये एक परिपूर्ण एसयूव्ही ठरण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
Hyundai टाकणार मोठा डाव, भारतात आणतेय पॉवरफुल Car, मारुतीला देणार टक्कर!
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement