Mahindra ने घेतला मोठा निर्णय, Thar मधील हे मॉडेल केले बंद!
- Published by:sachin Salve
Last Updated:
थार, थार रॉक्स, XUV700, स्कॉर्पिओ आणि इतर महिंद्राच्या एसयूव्हींनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी जोरदार टक्कर दिली आहे.
मुंबई: भारतीय कंपनी असलेल्या महिंद्राने भारतीय बाजारपेठेत आपला दबदबा कायम राखला आहे. महिंद्राची थार ही सर्वाधिक लोकप्रिय एसयूव्ही ठरली आहे. थार, थार रॉक्स, XUV700, स्कॉर्पिओ आणि इतर महिंद्राच्या एसयूव्हींनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांशी जोरदार टक्कर दिली आहे. पण आता महिंद्राने एक मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिंद्राच्या थारमधील काही व्हेरिएंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महिंद्रा थारचा भारतात खूप मोठे चाहता वर्ग आहेत. थार लाइनअपमधून निवडक प्रकार बंद केले आहेत. थारकडे आतापर्यंत १९ प्रकार होते, परंतु महिंद्रा ८ प्रकार बंद करण्याच्या मार्गावर आहे. या ८ प्रकारांमध्ये AX 4WD ट्रिम्स, कन्व्हर्टिबल टॉप ट्रिम्स आणि ओपन डिफरेंशियल असलेले LX प्रकार समाविष्ट आहे.
AX होतं एंट्री-लेव्हल मॉडेल
AX हा एंट्री-लेव्हल मॉडेल होतं. जो RWD आणि AWD सह उपलब्ध होता. महिंद्राने AX AWD बंद केल्यानंतर, AWD मिळविण्यासाठी बेस AX ट्रिमच्या वर स्थित LX ट्रिम खरेदी करावी लागेल. याशिवाय, AX ट्रिम आता फक्त डिझेल इंजिनसह उपलब्ध असेल. AWD LX प्रकारांचे ओपन डिफरेंशियल प्रकार देखील बंद करण्यात आले आहेत. ८ प्रकार काढून टाकल्यानंतरही, थारची किंमत अजूनही १३.८७ लाख ते २१.३२ लाख रुपयांच्या (ऑन-रोड, मुंबई) दरम्यान आहे.
advertisement
थारचे फिचर्स
वॉटरप्रूफ ७-इंच टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, हिल डिसेंट कंट्रोल आणि इतर अनेक फिचर्स या एसयूव्हीमध्ये होते. महिंद्रा थारमध्ये ३ इंजिन पर्याय आहे, ज्यामध्ये १.५-लिटर डिझेल इंजिन (११७ बीएचपी आणि ३०० एनएम), २.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (१५० बीएचपी आणि ३०० एनएम) आणि २.२-लिटर डिझेल इंजिन (१३० बीएचपी आणि ३०० एनएम). RWD आणि 4WD सह डिझेल आणि पेट्रोल प्रकार उपलब्ध आहेत.
Location :
First Published :
April 29, 2025 11:34 PM IST