गाड्या महाग होत असतानाच 13 हजार रुपयांनी स्वस्त झाली ही इलेक्ट्रिक स्कूटर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
EV Scooter Price: कंपनीने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरात त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
EV Scooter Price: इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी Wardwizard इनोव्हेशन्स अँड मोबिलिटीने शुक्रवारी घोषणा केली की त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी श्रेणीच्या किमती ₹13,000 पर्यंत कमी केल्या आहेत.
गुजरातमधील ही कंपनी जॉय या ब्रँड नावाने इलेक्ट्रिक स्कूटर विकते. कंपनीने म्हटले आहे की, इलेक्ट्रिक वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्यासाठी आणि देशभरात त्यांची लोकप्रियता वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
किंमत का कमी करायची?
बाजारात आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे आकर्षित करण्यासाठी कंपनीने त्यांच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत ही कपात केली आहे.
advertisement
Wardwizardने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, 'आम्हाला ईव्ही स्वीकारण्याची गती वाढवायची आहे आणि या किमतीत कपातीमुळे ग्राहकांना परवडणारे पर्याय उपलब्ध होतील, ज्यामुळे ईव्ही उद्योग आणखी मजबूत होईल."
advertisement
वॉर्ड विझार्ड इनोव्हेशन अँड मोबिलिटी लिमिटेड (पूर्वी मानवविजय डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून ओळखले जाणारे) ची स्थापना 20 ऑक्टोबर 1982 रोजी झाली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 19, 2025 4:14 PM IST