जे कारमध्ये सुपर फिचर्स ते Yamaha ने दिलं बाइकमध्ये, आणली दमदार आणि दणकट BIKE

Last Updated:

अलीकडेच Yamaha ने जे फिचर्स कारमध्ये दिलं आहे. तेच फिचर्स आपल्या बाईकमध्ये आणलं आहे. Yamaha ने बाइकमध्ये हायब्रिड टेक्नालॉजी आणली आहे.

News18
News18
Yamaha इंडियाने भारतात एकापेक्षा एक दुचाकी आणि स्कुटर लाँच करून भारतीय मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. अलीकडेच Yamaha ने जे फिचर्स कारमध्ये दिलं आहे. तेच फिचर्स आपल्या बाईकमध्ये आणलं आहे. Yamaha ने बाइकमध्ये हायब्रिड टेक्नालॉजी आणली आहे. आता Yamaha ने FZ-X Hybrid चं हायब्रिड व्हर्जन लाँच केलं आहे. याआधी यामाहाने FZ-S ही हायब्रिड पहिली बाइक लाँच केली होती. त्यानंतर आता FZ-X ही दुसरी हायब्रिड बाइक लाँच केली आहे.
Yamaha FZ-X Hybrid
Yamaha FZ-X Hybrid मध्ये जे अपग्रेड्स  आहे तेच आता  FZ-S Hybrid मध्ये दिले आहे. यामध्ये Integrated Starter Generator (ISG) आहे, जे  एकदम सायलेंट स्टार्ट आणि  स्टार्ट/स्टॉप टेक्नालॉजी दिली आहे. FZ-X Hybrid मध्ये 4.2-इंचाचा कलर TFT डिस्प्ले दिला आहे, जो  मोडिफायड स्विच गिअर आहे. तो डॅशवरील सगळे एडिशनल फक्शन कंट्रोल करतोय. जसे फिचर्स FZ-S Hybrid मध्ये पाहण्यास मिळाले.
advertisement
149cc, सिंगल-सिलेंडर इंजिन
Yamaha FZ-X Hybrid मध्ये तेच 149cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिले आहे, जे इतर FZ मॉडल्समध्ये आहे. हे पहिल्या सारखंच 12.4hp आणि 13.3Nm पॉवर जनरेट करतोय. यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे. Yamaha च्या 150cc  बाइक या कॉम्युटर  दुचाकींना हायब्रिड सिस्टम फ्युल क्षमताा वाढवण्यासाठी डिझाइन केली आहे,  परफॉर्मेंसशी याचा फार असा काही संबंध नाही. त्यामुळेच हायब्रिड व्हर्जनचा पॉवर आउटपुट नॉन-हायब्रिड व्हर्जन इतकाच आहे.
advertisement
किंमत किती? 
FZ-X Hybrid चं डिझाइन आणि महत्त्वाचे फिचर्स हे स्टँडर्ड FZ-X सारखेच आहे. फक्त वजनामध्ये फरक आहे.  हायब्रिड व्हेरिएंट चं वजन 141kg आहे, जे स्टँडर्ड व्हर्जनपेक्षा 2kg जास्त आहे. ही दुचाकी एकाच रंगात उपलब्ध आहे,  मॅट ग्रीन आणि गोल्डन व्हील्ससह उपलब्ध आहे. यामध्ये Yamaha मॅट टायटन असं म्हणते. Yamaha FZ-X Hybrid ची किंमत 1.49 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे, जी स्टँडर्ड FZ-X पेक्षा 20,000 आणि FZ-S Hybrid पेक्षा 5,000 जास्त आहे.
मराठी बातम्या/ऑटो/
जे कारमध्ये सुपर फिचर्स ते Yamaha ने दिलं बाइकमध्ये, आणली दमदार आणि दणकट BIKE
Next Article
advertisement
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
    View All
    advertisement