रेल्वेमध्ये 1600 पेक्षा जास्त पदांसाठी नोकरीची संधी, कोणी आणि कधी करु शकतं अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
- Published by:Devika Shinde
Last Updated:
उत्तर रेल्वेमध्ये ITI शिकाऊ उमेदवारी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज rrcpryj.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.
मुंबई, 14 डिसेंबर : तुम्ही जर रेल्वेमध्ये नोकरीच्या शोधात असाल आणि तुमचं ITI झालं असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. उत्तर मध्य रेल्वेच्या भर्ती कक्षामध्ये ITI शिकाऊ पदासाठी एकूण 1697 जागा रिक्त आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2023 आहे. या प्रशिक्षणार्थी भरतीसाठी वयोमर्यादा 14 ते 24 वर्षे आहे.
उत्तर रेल्वेमध्ये ITI शिकाऊ उमेदवारी भरतीसाठी ऑनलाइन अर्ज rrcpryj.org या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन करावा लागेल.
उत्तर मध्य रेल्वेमध्ये ज्या विभाग आणि विभागांमध्ये ITI शिकाऊ पदाची भरती केली जाईल ते आहे प्रयागराज विभाग- मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभाग, झाशी विभाग, कार्यशाळा झाशी आणि आग्रा विभाग.
उत्तर रेल्वेमध्ये रिक्त जागा
प्रयागराज-मेकॅनिकल विभाग-368
प्रयागराज-विद्युत विभाग-339
advertisement
झाशी विभाग- 528
कार्यशाळा झाशी-170
आग्रा विभाग-296
ITI किंवा ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी, उमेदवाराने 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधित ट्रेडमध्ये ITI केलेले असावे.
वय मर्यादा
-ITI किंवा ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे आहे.
-SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट मिळेल आणि OBC ला 5 वर्षांची सूट मिळेल.
advertisement
- दिव्यांग उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 10 वर्षांची सूट मिळेल.
-माजी सैनिकांनाही 10 वर्षांची सूट मिळेल.
अर्ज फी
- अर्जाची फी 100 रुपये आहे. जी पुन्हा केली जाणार नाही
-अर्ज SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांसाठी विनामूल्य आहे.
- फी फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावी लागेल.
निवडीची प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर 10वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाईल. दोन्ही गुणांचे वेटेज 50%-50% आहे. अधिसूचनेनुसार, रिक्त जागांनुसार उमेदवारांच्या दीड पट दस्तऐवज पडताळणीसाठी निवडले जातील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2023 6:01 AM IST
मराठी बातम्या/करिअर/
रेल्वेमध्ये 1600 पेक्षा जास्त पदांसाठी नोकरीची संधी, कोणी आणि कधी करु शकतं अर्ज? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया