Kokan Railway Job : कोकण रेल्वेमध्ये बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, असं करा अप्लाय

Last Updated:

कोकण रेल्वेने नोकरीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ट्रेनी अप्रॅनटिस पदांसाठी तब्बल 190 जागांची भरती होणार आहे. विविध अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि सामान्य प्रवाहातील तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे.

कोकण रेल्वेमध्ये बंपर भरती
कोकण रेल्वेमध्ये बंपर भरती
मुंबई, 4 डिसेंबर : कोकण रेल्वेने नोकरीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ट्रेनी अप्रॅनटिस पदांसाठी तब्बल 190 जागांची भरती होणार आहे. विविध अभियांत्रिकी, डिप्लोमा आणि सामान्य प्रवाहातील तरुणांना नोकरीची संधी मिळणार आहे. कोकण रेल्वेच्या पोर्टलवर wps.konkanrailway.com/nats/portal जाऊन पदवीधर, इंजिनिअर आणि डिप्लोमा केलेल्यांना 10 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड ऑनलाईन पद्धतीने सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग केलेल्यांचे अर्ज स्वीकारत आहे, याशिवाय 2019, 2020, 2021, 2022, किंवा 2023 साली पदी मिळवलेल्या सामान्य प्रवाहातील उमेदवारांचे अर्जही घेतले जात आहेत. हे पदवीधर शिकाऊ किंवा तंत्रज्ञ (डिप्लोमा) शिकाऊ म्हणून नावनोंदणीसाठी आहे, एका वर्षाच्या शिकाऊ प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. कोकण रेल्वेच्या अप्रायनटीस पदासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. तसंच निवड प्रक्रिया पात्रता गुण आणि पात्रता निकषांवर आधारित आहे.
advertisement
या पदासाठी भरती
सिव्हिल इंजिनिअर - 30 पदं
इलेक्ट्रिकल इंजिनिअर- 20 पदं
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर- 10 पदं
मेकॅनिकल इंजिनिअर- 20 पदं
डिप्लोमा (सिव्हील)- 30 पदं
डिप्लोमा (इलेक्ट्रिकल)- 20 पदं
डिप्लोमा (मेकॅनिकल)- 20 पदं
सामान्य पदवीधर- 30 पदं
किती पगार मिळणार?
पदवीधर अप्रॅनटीस- 9 हजार प्रती महिना
advertisement
टेकनिशियन (डिप्लोमा) अप्रॅनटीस- 8 हजार प्रती महिना
वयाची अट
1 सप्टेंबर 2023 रोजी वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25
1 सप्टेंबर 1998 ते 1 सप्टेंबर 2005 पर्यंत जन्म
अनुसूचित जाती/जमाती उमेदवारांसाठी 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे वयाची सूट
advertisement
पात्रतेच्या अटी
1 संभाव्य उमेदवारांनी नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) पोर्टलद्वारे ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली पाहिजे आणि त्यांच्याकडे वैध मान्यताप्राप्त NATS ID असणे आवश्यक आहे. ही आवश्यकता पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास कागदपत्र पडताळणी प्रक्रियेदरम्यान त्यांची उमेदवारी नाकारली जाईल.
2 ज्या उमेदवारांनी मागील 5 वर्षांमध्ये, विशेषतः 2019, 2020, 2021, 2022 आणि 2023 मध्ये पदवी प्राप्त केली आहे, त्यांचा विचार केला जाईल. ही कालमर्यादा पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यापासून ते प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणात सामील होण्याच्या तारखेपर्यंत मोजली जाते.
advertisement
शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रॅनटीस (इंजिनिअर) : संबंधित अभियांत्रिकी शाखेतील बीई किंवा बीटेक
डिप्लोमा अप्रॅनटीस : संबंधित अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा
सामान्य पदवी : आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट सायन्स, जर्नालिजम आणि मास कम्युनिकेशन, बिजनेस स्टडीजमध्ये पदवी
कोकण रेल्वे भरतीची निवड प्रक्रिया
कोकण रेल्वे प्रशिक्षणार्थी 2023 साठी त्यांची निवड प्रक्रिया पात्रता गुणांवर आधारित असेल. टक्केवारी काढण्यासाठी सर्व वर्ष/सेमिस्टरमध्ये मिळविलेले एकूण गुण एकत्रित केले जातील आणि त्यानुसार गुणवत्ता यादी संकलित केली जाईल. उच्च एकूण टक्केवारी असलेल्या उमेदवारांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिले जाईल. या निवडीसाठी कोणतीही परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार नाही.
advertisement
कसं कराल अप्लाय?
पात्र उमेदवारांनी KRCL ऑनलाइन पोर्टलद्वारे ऑनलाइन अर्ज भरावा.
उमेदवारांकडे सक्रिय ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि NATS पोर्टलचे नोंदणी/सत्यापित तपशील असणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी सर्व आवश्यक तपशील समाविष्ट करावा आणि आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी.
उमेदवारांनी अर्ज शुल्क रु. 100/- (SC/ST/अल्पसंख्याक/EWS/सर्व महिलांसाठी आवश्यक नाही) ऑनलाइन पद्धतीने भरावे.
advertisement
NATS अंतर्गत प्रशिक्षणासाठी ऑनलाइन अर्ज प्राप्त करण्याची अंतिम तारीख 10/12/2023 (रविवार) आहे.
मराठी बातम्या/करिअर/
Kokan Railway Job : कोकण रेल्वेमध्ये बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, असं करा अप्लाय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement