माजी नगरसेविकाच्या मुलीला शिवीगाळ, अंबरनाथमध्ये गावगुंडांनी पाडला रक्ताचा सडा, तरुण रक्तबंबाळ

Last Updated:

Crime in Thane: अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात दोन गटात जोरदार राडा झाला आहे. इथं माजी नगरसेविकाच्या काही गावगुडांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुडगूस घालत एका तरुणाला रक्तबंबाळ केलं आहे.

News18
News18
ठाणे: ठाणे जिल्ह्याच्या अंबरनाथमधील बारकूपाडा परिसरात दोन गटात जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. इथं माजी नगरसेविकाच्या काही गावगुडांनी हातात नंग्या तलवारी घेऊन भररस्त्यात धुडगूस घातला आहे. आरोपींनी तलवारीने वार करत एका तरुणाला रक्तबंबाळ केलं. यावेळी संबंधित तरुणाच्या काही नातेवाईकांनी हल्लेखोर गुंडांवर प्रतिहल्ला केला. दोन गटातील राड्यामुळे परिसरात मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. माजी नगरसेविकाच्या मुलीला शिवीगाळ केल्यामुळे हा राडा झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात ही घटना घडली. याच परिसरात राहणारी माजी नगरसेविकेची मुलगी काल (शुक्रवारी,ता13) सायंकाळी घरी येत होती. यावेळी रस्त्यात एक तरुण गाडीच्या आडवा आला. त्यामुळे नगरसेविकेच्या मुलीने या तरुणाला बाजूला हटण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न वाजवला. मात्र हा तरुण बाजुला झाला नाही. यामुळे नगरसेविकेची मुलगी संबंधित तरुणावर संतापली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादात संबंधित तरुणाने नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
advertisement
या प्रकारानंतर नगरसेविकेच्या समर्थक असलेल्या दोन तरुणांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच परिसरातील लोकांनी त्यांना घेराव घालत चोप दिला. तसेच त्यांचा पाठलाग करत थेट नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. या सगळ्या प्रकरणानंतर नगरसेविकेच्या गुंडांनी हल्ला केलेल्या तरुणाला रक्तबंबाळ अवस्थेत उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दोन गटा झालेल्या राड्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी बारकू पाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
advertisement
दरम्यान, अंबरनाथ परिसरातील आदिवासी महिलांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दाद मागितली. पारधी समाजाच्या या कुटुंबाच्या हक्काच्या जागेवरून त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप या महिलांनी केला. त्यासाठी स्थानिक नगरसेविकाचे गुंड दिवसा ढवळ्या तलवारी नाचवत फिरत आहेत, गुंडाच्या हल्ल्यात त्यांच्यातील एक तरूण गंभीर जखमी झाला असून तो मरणाच्या दारात पोहचला आहे. न्यायाची मागणी करण्यासाठी हे लोक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आले होते.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
माजी नगरसेविकाच्या मुलीला शिवीगाळ, अंबरनाथमध्ये गावगुंडांनी पाडला रक्ताचा सडा, तरुण रक्तबंबाळ
Next Article
advertisement
Vinod Ghosalkar On Tejasvee Ghosalkar: तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांगितलं...
तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग
  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

  • तेजस्वींचा भाजपात प्रवेश, १२ तास आधी घरात काय घडलं? सासरे घोसाळकरांनी सगळंच सांग

View All
advertisement