Crime News: मित्राने गर्लफ्रेंडचा अर्धा बर्गर खाल्ला म्हणून आला राग, गोळ्या झाडून संपवलं

Last Updated:

अगदी क्षुल्लक गोष्टीवरुन लोकांचा पारा चढतो. रागात लोक कधी काय करतील सांगता येत नाही. रागात लोकांनी विचित्र, धक्कादायक गोष्टी केल्याचंही पहायला मिळालं आहे.

 बर्गरसाठी मित्राला मारलं
बर्गरसाठी मित्राला मारलं
नवी दिल्ली : अगदी क्षुल्लक गोष्टीवरुन लोकांचा पारा चढतो. रागात लोक कधी काय करतील सांगता येत नाही. रागात लोकांनी विचित्र, धक्कादायक गोष्टी केल्याचंही पहायला मिळालं आहे. अशातच आणखी एक घटना समोर आलीय, ज्यामध्ये एका मुलाने बर्गरसाठी आपल्याच मित्राला मारलं. ही घटना समोर येताच खळबळ उडाली.
गर्लफ्रेंडचा अर्धा बर्गर मित्रानं खाल्ल्यामुळे मुलाला राग आला. रागाच्या भरात त्यानं मित्राला गोळी मारली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. रागाच्या भरात फक्त एका बर्गरवरुन त्यानं थेट मित्राचाच खून केला. हे प्रकरण सध्या इंटरनेटवर खळबळ माजवतंय.
जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिविषयी तुम्ही ऐकली असेलच असेल मात्र जीव घेणारी मैत्री खूपच भयंकर असते. सध्या समोर आलेली ही घटना अशीच काहीशी आहे, मैत्रित जीव दिला नाही तर घेतला. डॅनियल नावाच्या मुलानं त्याच्या आणि गर्लफ्रेंडसाठी बर्गर ऑर्डर केला होता. तेवढ्यात मित्र अलीनं डॅनियलची गर्लफ्रेंडचा अर्धा बर्गर खाल्ला. यावरुवन दोघांमध्ये वाद झाला. वाद एवढा वाढला की, डॅनियलनं अलीवर गोळी झाडली. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
advertisement
ही घटना निवृत्त वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) नजीर अहमद मीर बहार यांचा मुलगा डॅनियल नजीर मीर याने घडवली आहे. डॅनियलची मैत्रीण त्याला भेटायला येत असताना हा वाद झाला. पीडित 17 वर्षांचा मुलगा असून त्याचे वडील कराची जिल्हा दक्षिण सत्र न्यायाधीश आहेत. या घटनेची संपूर्ण कहाणी एका यूजरने Reddit वर शेअर केली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
Crime News: मित्राने गर्लफ्रेंडचा अर्धा बर्गर खाल्ला म्हणून आला राग, गोळ्या झाडून संपवलं
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement