Jalgaon Crime News : खबरी की ड्रग्ज तस्कर? दुबईतील आरोपीसोबत जळगावातील पोलिसाचे 300 हून फोन कॉल
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Jalgaon Crime News : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयिताशी तब्बल 352 वेळा मोबाईलवर संवाद झाल्याचे समोर आहे
विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील (एलसीबी) पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांचे एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार संशयिताशी तब्बल 352 वेळा मोबाईलवर संवाद झाल्याचे समोर आहे. ही माहिती समोर आल्यानंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पीएसआय दत्तात्रय पोटे यांच्याविरोधात शहरातील एमडी ड्रग्ज साठा प्रकरणातील फरार आरोपी व सध्या दुबईमध्ये असल्याचा संशय असलेल्या अरबाजशी वारंवार संवाद झाल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. पोलीस तपासात त्यांच्यात 352 वेळा फोनवर संपर्क झाल्याचे निष्पन्न झाले.
पीएसआय पोटे हे एमआयडीसी पोलीस स्थानकात कार्यरत असताना दोघांमध्ये हा संवाद झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. पीएसआय पोटे यांचे मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्ड (डीसीआर) व संभाषणाचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले की, “पोटे व संशयित यांच्यातील संभाषणाचे रेकॉर्डिंग तपासण्यात आले असून, त्यात तूर्त तरी कोणतेही आक्षेपार्ह मजकूर आढळून आलेला नाही,”
advertisement
दरम्यान, पीएसआय पोटे यांची एक महिन्यापूर्वी एलसीबीतून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आलेली आहे. या घडामोडींमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अबरार कुरेशी हा पीएसआय पोटे यांचा खबरी म्हणून काम करायचा असा दावा पोलिसांकडून केला जात आहे. परंतु आता चौकशी अंतिम सत्य काय ते समोर येणार आहे. दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Apr 18, 2025 1:29 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Jalgaon Crime News : खबरी की ड्रग्ज तस्कर? दुबईतील आरोपीसोबत जळगावातील पोलिसाचे 300 हून फोन कॉल










