Jalgaun Crime : जन्मदात्या बापालाच विळ्याने चिरलं, भयंकर घटनेने जळगाव हादरलं,नेमकं काय घडलं?

Last Updated:

जळगाव जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलानेच जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.घरात बाप लेकाचा कोणत्यातरी मुद्यावरून वाद झाला होता.

jalgaun crime news
jalgaun crime news
Jalgaun Dharangaon Crime News : जळगाव, विजय वाघमारे : जळगाव जिल्ह्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका मुलानेच जन्मदात्या बापाची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.घरात बाप लेकाचा कोणत्यातरी मुद्यावरून वाद झाला होता. या वादातून विळ्याने मुलानेच बापाची हत्या केल्याची घटना घडली आहे. छगन यादव कोळी (वय 75) असे मृत पित्याचे नाव होते. या प्रकरणी धरणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिकचा तपास सूरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिण्यावरून झालेल्या वादातून मुलाने आपल्या 75 वर्षीय वडिलांची लोखंडी विळ्याने हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. छगन यादव कोळी (वय 75) असे त्यांचे नाव होते. या हल्ल्यानंतर त्यांना लगेचच रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
advertisement
दारू पिऊन घरी आलेल्या समाधानसोबत छगन कोळी यांचा वाद विकोपाला गेला.या वादातूनच रागाच्या भरात समाधान कोळीने वडील छगन कोळी यांच्या पोटावर लोखंडी विळ्याने वार केले होते. या हल्ल्यात ते घरात रक्तबंबाळ झाले होते. या हल्ल्यानंतर छगन कोळी यांना ज ळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
advertisement
या घटनेनंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.या तक्रावरीन पोलिसांनी समाधान छगन कोळी (वय 42) आहे.याला ताब्यात घेऊन धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सूरू आहे.

प्रेयसीने नकार दिल्याने तरूणाचा गळफास

'मित्रांनो प्रेम करू नका, अभ्यास करा...मुली प्रेम विसरुन जातात', असं व्हिडीओ पोस्ट करत एका तरुणाने आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गांधली येथील 21 वर्षीय गौरव रवींद्र बोरसे या तरुणाने प्रेयसीने नकार दिल्याने गळफास घेतल्याची घटना घडली.
advertisement
ही धक्कादायक घटना डुबक्या मारोती रस्त्यालगत असलेल्या झाडाखाली उघडकीस आली. क्रीडा संकुलाच्या शेजारी ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गौरवने आत्महत्या केल्याचे समजातच मित्र परिवारातही एकच खळबळ उडाली. त्यानंतर गौरवने काही वेळेपूर्वी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचे काहींच्या लक्षात आले.
गौरव याने इंस्टाग्रामवर आत्महत्येपूर्वी एक भावनिक व्हिडीओ अपलोड केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या आईला रडू नको असे सांगत माफी मागितली, तसेच मित्रांना प्रेम न करण्याचा सल्ला दिला. "मी मुलीवर प्रेम केलं, ती विसरून गेली. माझं खरं प्रेम होतं, पण मी अपयशी ठरलो," गौरवने व्हिडीओत "मी चूक करतोय, ती तुम्ही करू नका" असं मित्रांना उद्देशून म्हणत त्याने आयुष्य संपवलं आहे.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
Jalgaun Crime : जन्मदात्या बापालाच विळ्याने चिरलं, भयंकर घटनेने जळगाव हादरलं,नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement