आधी महिलेवर सामूहिक अत्याचार नंतर काढली व्हिक्ट्री परेड, आरोपींच्या कृत्याने खळबळ

Last Updated:

Gangrape accused victory celebration : महिला एका हॉटेलमध्ये थांबली होती. आरोपींनी तिला हॉटेलमधून घसटत जंगलात नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.

News18
News18
बंगळुरू : बाईक, कार, म्युझिक, नारे... कुणी जिंकलं की त्यांना आनंदाने अशी रॅली काढताना तुम्ही पाहिलं असेल. कर्नाटकातही अशीच रॅली निघाली पण त्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. कारण ही रॅली कुणा सामान्य माणसाची, राजकारण्याची नाही तर चक्क गँगरेप करणाऱ्या आरोपींची. गँगरेप करणाऱ्या आरोपींची चक्क व्हिक्ट्री परेड निघाली आहे. या व्हिक्ट्री परेडमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे.
कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील हनागलमधील हे सामूहिक बलात्कार प्रकरण. जानेवारी 2024 मध्ये एका महिलेवर 7 आरोपींनी बलात्कार केला. 25 वर्षांची पीडिता केएसआरटीसीच्या ड्रायव्हरसोबत बऱ्याच काळापासून रिलेशनमध्ये होती. दोघांचाही धर्म वेगळा होता. महिला हनागलमधील एका हॉटेलमध्ये थांबली होती. आरोपींनी तिला हॉटेलमधून घसटत जंगलात नेलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
advertisement
याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या साक्षीनंतर सामूहिक बलात्काराचा आरोप लावण्यात आला. एकूण 19 लोकांना अटक करण्यात आली. ज्यापैकी 12 जणांना 10 महिन्यांआधी जामीन मिळाला आहे. 7 मुख्य आरोपी अनेक महिन्यांपासून ताब्यात होते.
पोलीस तपासात डीएनए, सीसीटीव्ही, 80 साक्षीदारांची साक्ष होती. पण कोर्टात पीडित महिला आरोपींनी ओळखू शकली नाही. त्यामुळे इतर 7 आरोपींचीही सुटका झाली. त्यांना जामीन मिळाला. हावेरी सेशन कोर्टाने आफताब चंदनकट्टी, मदा साब मंडक्की, समीवुल्ला लालनवर, मोहम्मद सादिक अगासिमानी, शोएब मुल्ला, तौसीप छोटी, रियाज साविकेरीला जामीन दिला.
advertisement
यानंतर जामीन मिळाल्याचा आनंद आरोपींनी साजरा केला. हावेरी उपजेलहून हा रोड शो सुरू झाला. बाईक, कार, म्युझिक, नारे अशी व्हिक्ट्री परेड काढली निघाली. हावेरीच्या अक्की अलूर शहरात ही परेड निघाली. आरोपींसह गाड्यांचे ताफे मुख्य रस्त्यावर निघाले. व्हिडीओत आरोपी हसत, विजय चिन्हं दाखवताना दिसत आहेत. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. लोकांना कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मराठी बातम्या/क्राइम/
आधी महिलेवर सामूहिक अत्याचार नंतर काढली व्हिक्ट्री परेड, आरोपींच्या कृत्याने खळबळ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement