लाॅजवर नेऊन गर्लफ्रेंडवर बलात्कार, लग्नास नकार देत बाॅयफ्रेंडच म्हणाला, "तू त्रास दिलास तर जीव देईन"
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे शुभम आबाराव देशमुख (रा. हिंगोली) या तरुणाने ऑगस्ट 2024 पासून एका तरुणीवर वेळोवेळी...
नाशिक : मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यानंतर लग्नाचे वचन देऊन एका तरुणाने वेळोवेळी तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. पीडित तरुणीने लग्नाची मागणी करताच, तरुणाने तिला नकार दिला आणि 'तू त्रास दिलास तर जीव देईन', अशी धमकी दिली. यानंतर अखेर घाबरलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
पहिली ओळख, नंतर प्रेम, पुढे संबंध...
याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात शुभम आबाराव देशमुख (रा. दोनवडे, ता. वसमत, जि. हिंगोली) याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात ऑगस्ट 2024 मध्ये झाली. पंचवटी परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीची शुभमसोबत ओळख झाली. या ओळखीचे लवकरच मैत्रीत आणि नंतर प्रेमसंबंधांत रूपांतर झाले.
advertisement
लाॅजवर नेऊन केला अत्याचार
याच प्रेमसंबंधांचा गैरफायदा घेत, शुभमने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला आपल्या जाळ्यात ओढले. त्याने नाशिकमधील मालेगाव स्टँड, पेठ फाटा येथील लॉजवर, इतकेच नव्हे तर ठाण्यातील आपल्या बहिणीच्या घरी नेऊन तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला.
तरुणाने पीडितेला 'आत्महत्या' करण्याची दिली धमकी
काही काळाने पीडित तरुणीने लग्नासाठी त्याच्याकडे तगादा लावला असता, शुभमने लग्नास नकार दिला. एवढ्यावरच न थांबता, 'तू जर मला त्रास दिलास, तर मी माझे काहीतरी बरे-वाईट करून घेईन,' अशी धमकीच त्याने दिली. त्याच्या या धमकीमुळे आणि फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पीडित तरुणीने अखेर पंचवटी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत.
advertisement
हे ही वाचा : Navi Mumbai : शिक्षिकेचे अश्लिल चॅट्स, विद्यार्थ्याला पाठवले प्रायव्हेट Video, मुंबईनंतर आता नवी मुंबई हादरली
हे ही वाचा : प्रेम की डिप्रेशन? साखरपुड्यानंतर तरुणीने कृष्णा नदीत घेतली उडी, आत्महत्येचं नेमकं कारण काय?
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लाॅजवर नेऊन गर्लफ्रेंडवर बलात्कार, लग्नास नकार देत बाॅयफ्रेंडच म्हणाला, "तू त्रास दिलास तर जीव देईन"