1500 रुपयांसाठी लाखमोलाचा जीव धोक्यात, OTP साठी लाडक्या बहि‍णींना चढावा लागतो डोंगर, हृदयद्रावक कहाणी

Last Updated:

नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी OTP मिळवण्यासाठी डोंगर चढावे लागते, नेटवर्क अभावामुळे ई-केवायसी प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत आहेत.

News18
News18
नंदुरबार, प्रतिनिधी निलेश पवार: राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील महिलांना अक्षरशः डोंगरांवर चढून जावं लागत आहे. परिस्थिती इतकी वाईट आहे की अनेक ठिकाणी रेंजच येत नाही किंवा कमी रेंज असेल तर तिथे केवायसी होत नाही. धडगाव तालुक्यातील खर्डी खुर्द या गावासह नर्मदा नदीच्या काठावरील अनेक गावांमध्ये मोबाईल नेटवर्कची रेंज नसल्यामुळे, ओटीपी मिळवण्यासाठी महिलांना उंच टेकड्यांवर आणि डोंगरांवर जावं लागत आहे. त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
ओटीपीसाठी डोंगर चढण्याची वेळ
शासनाने स्पष्ट केले आहे की, ज्या 'लाडक्या बहिणीं'ची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होणार नाही, त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे हा लाभ गमावू नये म्हणून या महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. ओटीपी येण्यासाठी रेंज शोधत उंच ठिकाणी चढणे, त्यातही तांत्रिक अडचणींमुळे वारंवार ओटीपी न येणे, यामुळे अनेकांची निराशा होत आहे. या महिलांना पाण्याच्या किंवा विजेच्या समस्येपेक्षाही जास्त मोठी समस्या आज 'नेटवर्क रेंज'ची वाटत आहे.
advertisement
ई-केवायसी बंधनकारक, प्रक्रिया अशी पूर्ण करा
लाडकी बहीण योजनेचा लाभ नियमित सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. ही प्रक्रिया प्रामुख्याने आधारशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावरील ओटीपी द्वारे पूर्ण केली जाते.ॉ
'लाडकी बहीण' योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. आधार क्रमांक/नोंदणी क्रमांक भरा, तुमचा अर्ज क्रमांक आणि आधार क्रमांक भरून ई-केवायसीचा पर्याय निवडा. तुमच्या आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP भरून पडताळणी पूर्ण करा.
advertisement
नवऱ्याचेही द्यावे लागणार आधार कार्ड
यावेळी ई केवायसी फक्त लाभार्थी महिलांची होणार नाही. तर नवरा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर द्यावा लागणार आहे. त्यातही अनेक अडचणी येत आहे. काही ठिकाणी वडील नाहीत, नवरा किंवा वडिलांचा नंबर आधारशी लिंक नाही, अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ई केवायसीसाठी ही अट शिथिल करावी अशी मागणी महिलांकडून केली जात आहे. या दोन महिन्यात ई केवायसी पूर्ण करावी असं आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे.
advertisement
नेटवर्क नसलेल्यांसाठी उपाययोजना
ज्या भागांमध्ये मोबाईल रेंजची गंभीर समस्या आहे, त्यांनी खालील पर्यायांचा विचार करावा. जवळच्या बँक शाखेत किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये जाऊन, बायोमेट्रिक पद्धतीद्वारे (बोटाचे ठसे) ई-केवायसी पूर्ण करता येते का, याची चौकशी करावी. योजनेच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत स्थानिक स्तरावर शिबिरे आयोजित करण्याची मागणी करावी.
advertisement
प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी
मोबाईल रेंज नसल्यामुळे महिलांना डोंगराची चढाई करावी लागणे ही अत्यंत विदारक परिस्थिती आहे. एका बाजूला डिजिटल इंडियाचा नारा दिला जात असताना, नर्मदा काठावरील नागरिकांना अजूनही साध्या नेटवर्कसाठी झगडावे लागत आहे. राज्य शासनाने आणि संबंधित दूरसंचार कंपन्यांनी या आदिवासी भागातील नेटवर्कची समस्या तातडीने सोडवावी, जेणेकरून 'लाडक्या बहिणीं'ना त्यांचे हक्काचे पैसे घेण्यासाठी जीव धोक्यात घालावा लागणार नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
1500 रुपयांसाठी लाखमोलाचा जीव धोक्यात, OTP साठी लाडक्या बहि‍णींना चढावा लागतो डोंगर, हृदयद्रावक कहाणी
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement