वडील ट्रेनमध्ये विकतात साबणाच्या वड्या, लेकीने KBC मध्ये 90 सेकंदात जिंकले 5 लाख! चिमुरडीची बुद्धी पाहून BIG Bही शॉक
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kaun Banega Crorepati Junior : ११ वर्षांच्या चिमुरडीने 'कौन बनेगा करोडपती ज्युनियर'च्या मंचावर फक्त आपल्या बुद्धिमत्तेने नाही, तर आपल्या हाजिरजबाबीपणाने सर्वांची मने जिंकली.
मुंबई : भोपाळच्या नरियलखेडा भागातील ११ वर्षांच्या जान्हवी पुरसवानी हिने 'कौन बनेगा करोडपती ज्युनियर'च्या मंचावर फक्त आपल्या बुद्धिमत्तेने नाही, तर आपल्या हाजिरजबाबीपणाने सर्वांची मने जिंकली. अत्यंत सामान्य परिस्थितीतून आलेल्या जान्हवीने केवळ ९० सेकंदांत १० प्रश्नांची बरोबर उत्तरं देत ५ लाख रुपये जिंकले.
आई-वडिलांचा संघर्ष आणि जान्हवीचं स्वप्न
जान्हवीच्या कुटुंबाचा संघर्ष हृदय पिळवटून टाकणारा आहे. जान्हवीचे वडील चेतन पुरसवानी दिव्यांग आहेत आणि ते कसेबसे ट्रेनमध्ये साबण, टूथपेस्ट आणि ब्रश विकून कुटुंबाला आधार देतात. आई मीना पुरसवानी अगरबत्तीच्या कारखान्यात काम करतात आणि रोज २०० ते २५० रुपये मजुरी कमावतात. हे कुटुंब दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहते. या आर्थिक अडचणींवर मात करून जान्हवीने केबीसीच्या हॉटसीटवर पोहोचणे, हीच मोठी गोष्ट आहे.
advertisement
शोदरम्यान जान्हवीच्या बोलक्या स्वभावाने सर्वांनाच हसू आवरवले नाही. अमिताभ बच्चन यांनी जेव्हा तिला प्रश्न विचारला, तेव्हा जान्हवी निरागसपणे म्हणाली, “सर, टीव्हीवर पाहते, तेव्हा तुम्ही जास्त चांगले दिसता. आता मला खात्री झाली की, तुम्ही व्हिडिओमध्ये फिल्टर वापरता!”
हे ऐकून अमिताभ बच्चन यांना हसू आवरवले नाही. त्यांनी गमतीने उत्तर दिले, "देवीजी, आम्हाला माफ करा!" यानंतर जान्हवी म्हणाली, "मला मनात आले तेच मी बोलले. मला सरांची भीती वाटली नाही, त्यांनी तर मला प्रेमाने 'देवीजी' म्हटले."
advertisement
advertisement
९० सेकंदांत १० प्रश्नांची अचूक उत्तरे
'सुपर संदूक' फेरीत ९० सेकंदांत १० प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन जान्हवीने सर्वांना आश्चर्यचकित केले. "अमिताभ सर म्हणाले होते की, जर सर्व उत्तरे बरोबर दिली, तर तुला घरी जेवायला बोलावू! आता ते स्वतः फोन करून बोलावतील," असे जान्हवीने हसून सांगितले.
तिच्या आईने सांगितले की, जान्हवीच्या वडिलांनी तीन वर्षांपासून तिच्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. यावर्षी जेव्हा जान्हवीची निवड झाल्याचा फोन आला, तेव्हा वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. जान्हवी आता डॉक्टर बनून कुटुंबाचे नाव रोशन करण्याचे स्वप्न पाहत आहे.
advertisement
जान्हवीचे शिक्षक अनमोल अग्रवाल यांनी सांगितले की, तिने रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन क्लासमध्ये सराव केला. तिच्या शिक्षिकेने तिच्या शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण स्वभावाचे कौतुक केले आहे. जान्हवीने आपल्या मेहनतीने केवळ भोपाळचेच नाही, तर संपूर्ण मध्य प्रदेशचे नाव रोशन केले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 10, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
वडील ट्रेनमध्ये विकतात साबणाच्या वड्या, लेकीने KBC मध्ये 90 सेकंदात जिंकले 5 लाख! चिमुरडीची बुद्धी पाहून BIG Bही शॉक