Abhishek-Aishwarya: घटस्फोटाच्या चर्चांचा 'The End', अखेर अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय आले एकत्र!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचं पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. दिवसेंदिवस या बातम्यांना हवा मिळत गेली आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेलं पहायला मिळत होतं.
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचं पॉवर कपल अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. दिवसेंदिवस या बातम्यांना हवा मिळत गेली आणि सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेलं पहायला मिळत होतं. अभिषेक आणि ऐश्वर्याचे चाहतेही दोघांविषयी चिंतेत होते. अखेर या घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून दोघेही एकत्र दिसले आहेत. दोघंही एकत्र असलेला फोटो समोर आला आहे.
अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरलेला असताना दोघांचा एकत्र फोटो समोर आला आहे. या फोटोंनी घटस्फोटाच्या रंगलेल्या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. कपलमध्ये सगळंकाही अलबेल असल्याचं फोटोवरुन दिसून येतंय. हा फोटो अगदी काही वेळातच इंटरनेटवर वाऱ्यासारखा फिरताना दिसतोय.
फिल्ममेकर अनु रंजनने तिच्या इंस्टाग्रामवर गुरुवारी रात्री पार्टीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ऐश्वर्या अभिषेक एकत्र दिसत असून दोघांच्याही चेहऱ्यावर मस्त आनंद पहायला मिळतोय. या फोटोमध्ये ऐश्वर्याची आई वंदा राय पण होती. हा फोटो शेअर करत अनुने लिहिलं, 'खूप सारं प्रेम'
advertisement
advertisement
गेल्या काही काळापासून कोणताही कार्यक्रम, समारंभ असो अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्र दिसले नाहीत. दोघ्ही वेगवेगळे स्पॉट होत होते. त्यामुळे दोघांमध्ये काही ठीक नसून दोघे वेगळे होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अभिषेकचं अभिनेत्री निम्रत कौरसोबत अफेअर असल्याच्याही रंगल्या. मात्र आता या सगळ्या अफवांना या फोटोने सडेतोड उत्तर दिलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2024 2:03 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Abhishek-Aishwarya: घटस्फोटाच्या चर्चांचा 'The End', अखेर अभिषेक बच्चन-ऐश्वर्या राय आले एकत्र!