'तुझी मिस वर्ल्ड इमेज संपवायची आहे' अन् जेव्हा सुभाष घईनं ऐश्वर्याला लोळवलं चिखलात, Video

Last Updated:

1999 साली आलेल्या 'ताल' या सिनेमानं ऐश्वर्याचं करिअर घडवलं. ऐश्वर्याच्या आयुष्यातील 'ताल' हा अत्यंत महत्त्वाचा सिनेमा होता.

सुभाष घईनं ऐश्वर्याला लोळवलं चिखलात
सुभाष घईनं ऐश्वर्याला लोळवलं चिखलात
मुंबई, 19 डिसेंबर : बॉलिवूडची माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय. तिनं आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ऐश्वर्या एक दमदार आणि टॅलेंडेट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये ऐश्वर्यानं एकाहून एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्याला फक्त मिस वर्ल्ड म्हणून ओळखलं जात होतं. तिच्यात अभिनेत्रीसाठी असलेली सगळे गुण होते मात्र तिला फक्त कॉस्मेटिक्स अँड्स आणि मॉडेलिंग क्षेत्रातच काम मिळत होतं. पण ऐशमध्ये असलेले गुण कोणी अचूक हेरले असतील ते प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते सुभाष घई यांनी.
1999 साली आलेल्या 'ताल' या सिनेमानं ऐश्वर्याचं करिअर घडवलं. ऐश्वर्याच्या आयुष्यातील 'ताल' हा अत्यंत महत्त्वाचा सिनेमा होता. सुभाष घई यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. ब्यूटी क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्याचा एक वेगळात अंदाज या सिनेमा तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला. आजही ताल मधील ऐश्वर्याचा अभिनय आणि तिची गाणी प्रेक्षकांना मोहिनी घालतात.
advertisement
फार कमी लोकांना माहिती असेल की ऐश्वर्यानं ताल सिनेमाचं संपूर्ण शुटींग हे विना मेकअप केलं होतं. आपल्या नैसर्गिक सौंदर्यानं ऐश्वर्यानं सगळ्यांना आपल्या प्रेमात पाडलं होतं. तिच्या नैसर्गिक सौंदर्यावर लाखो लोक फिदा झाले होते.
दिग्दर्शक सुभाष घई यांनी ताल या सिनेमातून ऐश्वर्याची मिस वर्ल्ड म्हणून असलेली इमेज ब्रेक केली होती. सुभाष घई नुकतेच इंडियन आइडलमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा त्यांना तालमध्ये ऐश्वर्यानं घेतलेल्या मेहनतीचं फार कौतुक केलं. तालमधील एका गाण्यामागचे BTS देखील सांगितले.
advertisement
सुभाष घई म्हणाले, 'ताल सिनेमात जेव्हा मी ऐश्वर्याला कास्ट केलं तेव्हा मी पहिल्यांदा मी तिला हेच सांगितलं होतं की मला तुढी मिस वर्ल्ड वाली इमेज संपवायची आहे. कारण माझ्या सिनेमाच्या कथेतील मुलगी एक डिवाइन मुलगी होती. जी निसर्गात राहाणारी आहे. डोंगरावर, झाडांवर प्रेम करणारी आहे. तिच्या नैसर्गिक सौंदर्य दडलं आहे. तिला सुंदर दिसण्यासाठी वेगळं काही करण्याची गरज नाही'.
advertisement
सुभाष घई पुढे म्हणाले, 'ताल से ताल मिला... हे सिनेमातील सुपरहिट गाणं आम्ही खऱ्या पाऊसात शुट केलं. गाणं शुट करताना मला समोर एक गवताचं पठार दिसलं. जिथे चिखल जमा झाला होता आणि चिखलात पाणी होतं. त्यानतंतर मी ऐशला विचारलं की, गाण्यात सावन ने भिगो दिया... अशा ओळी आहेत. त्यासाठी तू त्या चिखलात बसशील का? ऐशनं जराही वेळ न घेता त्या चिखलात उडी मारली'.
advertisement
ताल से ताल मिला या गाण्यात ऐश्वर्याचा एक टॉप शॉट आहे ज्यात ती चिखलात झोपली आहे. या शॉटनंतर सुभाष घई यांनी ऐश्वर्याचं खुप कौतुक केलं होतं. इंडियन आयडिअलच्या मंचावर देखील हा किस्सा सांगताना सुभाष घई यांनी ऐश्वर्याला हॅट्स ऑफ ऐश्वर्या असं म्हटलं.
मराठी बातम्या/मनोरंजन/
'तुझी मिस वर्ल्ड इमेज संपवायची आहे' अन् जेव्हा सुभाष घईनं ऐश्वर्याला लोळवलं चिखलात, Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement